डोंबिवली पलावा सिटी परिसरात झोमॅटो-स्विगी बाईकर्सचा संप.
उत्पन्न घट आणि दंडामुळे रायडर्स असंतोषात.
४०० पेक्षा जास्त रायडर्स संपावर, अन्न वितरण ठप्प.
मनसेने या संपाला दिला पाठिंबा, कंपनी व्यवस्थापनावर दबाव.
सद्याच्या जीवनात स्वीगी आणि झोमॅटो सारख्या सुविधा आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक झाल्या आहेत. घर बसल्या ऑर्डर केलेले जेवण, किराणा, वस्तू व्यवस्थित घरपोच करणं हे काम स्वीगी आणि झोमॅटोसारख्या ऑनलाईन सेवेमुळे अगदी दिलासा देणार ठरत आहे. मात्र ही सेवा देणारे बाईकर्स संपावर गेले तर ? अशीच घटना डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवली पलावा सिटी परिसरात आज झोमॅटो आणि स्विगी कंपनीच्या बाईकर्सनी संपाची घोषणा केली. कंपनीच्या जाचक अटी वर नाराज होऊन सुमारे ४०० ते ५०० डिलेव्हरी बाईकर्स संपावर गेले आहेत. विविध मागण्यांसाठी हे बाईकर्स संपावर गेले असल्याचं म्हटलं जात आहे. या संपाला मनसेने पाठिंबा दर्शवला आहे.
झोमॅटो आणि स्विगी कंपनीच्या बाईकर्सच्या म्हणण्यानुसार, त्यांचे उत्पन्न ५०% पर्यंत कमी झाले आहे. इतकेच नाही तर ग्राहकांच्या चुकीमुळे ऑर्डर रद्द झाली तरी कंपनी स्वतः तोटा सहन करण्याऐवजी बाईकर्सवर दंड आकारते. त्याच बरोबर एखादा अपघात झाला तर आम्हाला भरपाई मिळत नाही.
Dombivli News: गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी मूर्तीकार फरार; डोंबिवलीत भक्तांची धावपळतसेच कंपनी आम्हाला कोणतीही सुविधा न देता आमच्याकडून काम करून घेते. या जाचक अटी रद्द करून आम्हाला कामगारांना मिळणाऱ्या सुविधा कंपनीने द्याव्या या मागणीसाठी डोंबिवलीत स्विगी व झोमॅटो या कंपनीत काम करणाऱ्या ४०० ते ५०० डिलेव्हरी बाईकर्सनी संप पुकारला आहे.
Dombivli : डोंबिवलीत भाजपाला मोठा धक्का, ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने माजी नगरसेविका पत्नीसह सोडली पक्षाची साथ; अंतर्गत मतभेदाचे पडसादया संपाला पाठिंबा मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे या कर्मचाऱ्यांनी मदत मागितली होती. यांच्या मदतीसाठी पुढे येत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या कामगारांच्या संपला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर स्विगी झोमॅटोच्या जाचक अटिंचा यावेळी निषेध करण्यात आला. त्यामुळे पलावा लोढा भागातील स्विगी झोमॅटोचे ४०० डीलेव्हरी बाईकर्स संपावर आहेत. आता कंपनी व्यवस्थापन काय निर्णय घेते तसेच संपूर्ण प्रकरणात मनसे पुढे काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.