पुणे, ता. १५ ः देशात विविध ठिकाणी उघडत असलेल्या ‘गार्गी’च्या नव्या दालनांचे उद्घाटन सेलिब्रिटींच्या हातून करण्यापेक्षा आजच्या स्त्रियांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘गार्गी’ सहकाऱ्यांच्या कुटुंबातील महिलांना हा मान देण्यात आला आहे. येत्या घटस्थापनेला नागपूर आणि अमृतसर येथेही ‘गार्गी’च्या नव्या दालनांचे उद्घाटन या अनोख्या पद्धतीने होणार आहे.
पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांचा समृद्ध वारसा लाभलेला ब्रँड म्हणजे ‘गार्गी’. सिल्व्हर आणि नॅचरल डायमंडचे दररोजच्या वापरासाठीचे सुंदर कानातले, ब्रेसलेट्स, फंक्शनल नेकलेस किंवा खास प्रसंगासाठीचे मिनिमल डिझाइनर सेट यांच्या माध्यमातून ‘गार्गी’ ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये नवा पायंडा पाडत आहेच, पण त्या सोबतच ‘गार्गी’च्या दालनांचे उद्घाटनही वेगळ्या पद्धतीने होत आहे. महाराष्ट्रात पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये ‘गार्गी’ची दालने आहेत.
देशातील पहिला लिस्टेड सिल्व्हर ज्वेलरी ब्रँड असलेल्या ‘गार्गी’ने गेल्या तीन वर्षांत ९२५ सिल्व्हर ज्वेलरी आणि नॅचरल डायमंड दागिन्यांचे वैविध्यपूर्ण कलेक्शन घेऊन, देशभर आपला ठसा उमटवला आहे. भारतातील प्रत्येकापर्यंत दागिन्यांची अप्रतिम डिझाइन्स पोहचावी, या उद्देशाने आता ‘गार्गी’ने चार नवी दालने सुरू केली आहेत. त्यातली दोन लखनौमध्ये असून, एक कुर्ला (मुंबई) आणि एक पाटणा येथे ही दालने आहेत. ‘गार्गी’च्या २० पेक्षा जास्त एक्सक्लुसिव्ह स्टोअर्ससह आता एकूण १०१ पॉइंट ऑफ सेल्स भारतभर सुरू आहेत. यामध्ये सर्व पु. ना. गाडगीळ आणि सन्सची शोरूम्स आणि देशभरातील शॉपर्स स्टॉप यांचा समावेश आहे.