Laughing Benefits : हसण्याने खरंच आयुष्य वाढतं का? विज्ञान कायं सांगतं?
Marathi September 16, 2025 05:25 PM

हसणं आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचे आहे हे सर्वांनाच माहीत आहे. हसल्याने मन खुश राहतं शिवाय आरोग्यही सुधारतं, आयुष्य वाढतं असं आपण अनेकदा ऐकलं असेल. त्यामुळे सतत हसत राहावे असा सल्ला तज्ज्ञ देतात. पण, खरंच असं घडतं का? हसल्याने आयुष्य वाढते का? विज्ञान याबद्दल काय सांगतं जाणून घेऊयात.

हसताय ना..हसायलाच पाहिजे.. हा डायलॉग आपण सतत कॉमेडी शोच्या माध्यमातून ऐकत असतो. पण, प्रत्यक्षात सुद्धा हे खरंच आहे. हास्य हे केवळ मूड सुधारण्यासाठी उपयोगी नाही तर आरोग्य सुधारण्याचे सर्वात स्वस्त टॉनिक आहे. हल्लीच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या लाइफस्टाइलमध्ये लोक हसरणे विसरले आहेत. पण, हसणं आवश्यक आहे. असं सांगितलं जातं की, हसल्याने ताण कमी होते. ताण कमी झाल्याने दीर्घायुष्य वाढते. विज्ञान आणि आयुर्वेदानेही या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा – Health Tips: रात्री ब्रा घालून झोपता? मग होतील गंभीर समस्या; एकदा तज्ञांचे मत वाचाच !

आयुर्वेदानुसार हसणं आवश्यक का?

आयुर्वेदात हास्याला नैसर्गिक टॉनिक म्हटले आहे. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा वात-पित्त-कफ यांचे संतुलन राहते. पचनक्रिया सुधारते आणि शांत झोप लागते. आयुर्वेदानुसार असे सांगितले जाते की, हसण्याने आणि आनंदी राहण्याने आयुष्यमान वाढते.

विज्ञान काय सांगतं?

विज्ञानानुसार, जेव्हा तुम्ही हसता तेव्हा मेंदूतून एंडोर्फिन आणि डोपामाइन बाहेर पडतात, ज्यामुळे ताण कमी होतो. रक्ताभिसरण सुधारते, हृदय निरोगी राहते. संशोधनानुसार, दररोज 10 ते 15 मिनिटे हसल्याने व्यायामइतकेच फायदे शरीराला होतात. ज्यामुळे आयुष्य वाढण्यास मदत होते.

रोज हसण्याची सवय कशी लावायची?

  • दररोजच्या आयुष्यातील विनोदी गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
  • दिवसातील काही वेळ कॉमेडी चित्रपट किंवा सिरियल्स पाहू शकता.
  • मित्र आणि कुटूंबियांसोबत विनोद शेअर करा, गप्पा मारा, मन मोकळं करा.
  • खोट हसायला शिका. खोटे हसण्याने सुद्धा आयुष्य वाढतं.
  • नेहमी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करावा.

हेही वाचा – झुग थेरपी: जाडू की फिप्पी ते बांती हा! आपली मॅरेल मिथी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.