शेवगाव : शेवगाव - पाथर्डी तालुक्यातील पूरग्रस्त स्थितीच्या पाहणीत भयावह चित्र पहायला मिळाली. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे करण्याची स्थिती सध्या नाही. अद्यापही पाणी असल्याने परिस्थिती खूप कठीण आहे. पंचनाम्यासाठी मनुष्यबळाची अडचण येऊ नये, यासाठी प्रसंगी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात यावा. अतिवृष्टी नसलेल्या भागातील कर्मचाऱ्यांना पंचनाम्यासाठी उपलब्ध करून द्यावे. अतिवृष्टी व पूरबाधीत क्षेत्रातील झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा, असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले.
Smart Meter: मीटरचा हिशोब ‘स्मार्ट’ की फसवा?; वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त, दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात रांगातालुक्यातील ढोरा, नंदिनी नद्यांना आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत विखे पाटील यांनी अमरापूर, फलकेवाडी फाटा, भगूर, जोहरापूर येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार आकाक्ष दहाडदे, तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, गटविकास अधिकारी सोनल शहा, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, भाजपचे जिल्हा चिटणीस अरुण मुंढे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल सागडे, अण्णासाहेब ढोके, युवराज नरवडे, कमलेश गांधी, धनंजय फलके, बाळासाहेब कोळगे आदी उपस्थित होते.
सोमवारी पाथर्डी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील नंदिनी, ढोरा नद्यांसह ओढ्या नाल्यांना महापूर आला. ढोरानदीच्या पुराचे पाणी वडुले वाघोली, ढोरजळगाव, आपेगाव, आखातवाडे, मळेगाव, सामनगाव, लोळेगाव, तर नांदणी नदीला आलेल्या पुरामुळे वरूर, भगूर, वडुले, जोहरापूर, तर सकुळा नदीवरील अमरापूर व फलकेवाडी या गावातील नदी काठच्या लोकवस्तीत शिरले.
यामुळे पिके व जमिनींसह घरांचे प्रचंड नुकसान झाले, तर जनावरे देखील दगावले. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून घेतलेल्या पिकांचे क्षणार्धात नदीच्या पुरामुळे होत्याचे नव्हते झाले. यातील अमरापूर, फलकेवाडी, भगूर व जोहरापूर येथे विखे यांनी या भागातील पडझड झालेल्या घरे, जनावरांची गोठे व भुईसपाट झालेल्या कपाशी, तूर, ऊस, फळबागा आदी पिकांची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी महापुरात झालेल्या नुकसानीची कैफियत मांडली.
आनंदाची बातमी! 'गायीच्या दूध दरात तीन रुपयांपर्यंत वाढ'; सातारा जिल्ह्यात सुमारे ५५ हजार दूध उत्पादकांना दिलासा त्वरित मदत करा ; शेतकऱ्यांचे निवेदनभगूर येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, वरूर येथील ग्रामस्थांनी, तर शेवगाव येथे जनशक्ती विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विखे यांना पूरग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्याची मागणी निवेदनाव्दारे केली.