पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज पुण्यात भव्य ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले होते. हा ड्रोन शो पाहून पुणेकर भारावून गेले.
Barshi Live: चांदणी नदीच्या पुरात वाहणाऱ्या व्यक्तीला तरुणांनी जीवाची बाजी मारत वाचवलेबार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने चांदणी नदीला पूर आला आहे. त्यामुळे आगळगावसह अनेक गावांचा बार्शी तालुक्याशी संपर्क तुटला असून आज दुपारी या नदीच्या पुलावरून एक दुचाकीस्वार बार्शीकडे जात घसरला आणि पूराच्यापाण्यात वाहून जाऊ लागला. तो वाहताना दिसताच तिथे उपस्थित असलेल्या शुभम गरड, रवि कोल्हे, गोट्या शिंदे व हैदर मुजावर मदतीला धावले. त्यांनी जीवाची बाजी लावत त्या व्यक्तीचे प्राण वाचवले.
Asia Cup 2025 live: पाकिस्तानने आशिया कपवर बहिष्काराचा निर्णय बदलला? खेळाडूंनी सोडलं हॉटेलपाकिस्तान क्रिकेट संघाला आज युएईविरुद्ध सामना खेळायचा आहे. पण सामन्याला दोन तासच राहिले असताना खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्यास सांगण्यात आले होते. पण आता पाकिस्तानने सामना खेळण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे कारण खेळाडू स्टेडियमकडे निघाले आहे. सामना एकतास उशिराने सुरू होऊ शकतो.
Pimpalgaon Live: पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोच्या भावात घसरणपिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोच्या भावात घसरण झाली आहे. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत अधिक पुरवठा होत असल्याने टोमॅटोचे बाजार भाव कोसळले. गेल्या महिन्यात सातशे ते आठशे रुपये वीस किलोच्या क्रेट्सला बाजार भाव मिळत होता. मात्र आता या दरात शंभर ते दीडशे रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडला आहे.
Himachal Live: हिमाचल आपत्तीवर भाजप खासदार कंगना राणौत यांचे विधानभाजप खासदार कंगना राणौत हिमाचल आपत्तीबद्दल म्हणाल्या, “हे खूप दुःखद आहे. सर्वत्र लोक आपत्तीचा सामना करत आहेत. आज आम्ही येथे यज्ञ आयोजित केला. संतांनी जगाच्या कल्याणासाठी देव-देवतांचे आवाहन केले आहे. मंडी परिसरातील कामांबाबत मी गृहमंत्र्यांशी भेटलो. आम्ही मंडीच्या प्रकल्पांवर दिवसरात्र काम करत आहोत. आम्ही लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहोत.”
Eaknath shinde: मीनाताई ठाकरे पुतळ्याचा अवमान, दोषींना अजिबात सोडले जाणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकल्याण शहरात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तींनी रंग फेकून अवमान केला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, "हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे, दोषींना अजिबात सोडले जाणार नाही. मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. मुख्यमंत्री देखील या घटनेकडे गांभीर्याने पाहत आहेत," असे आश्वासन दिले आहे. दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
Anjali Damania live: अंजली दमानिया यांचा छगन भुजबळांवर गंभीर आरोपअंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, भुजबळ आणि त्यांच्यासारखे अनेक मंत्री जय्यत पैसा कमावतात आणि त्यांच्याविरुद्ध कितीही लढा दिला तरी न्याय मिळत नाही. कोविड काळात त्यांनी दाखल केलेल्या पिटीशनवर जीआर काढण्यात आला ज्यामुळे महाराष्ट्र सदन घोटाळ्याला आव्हान देता येऊ शकत नव्हते. त्यानंतर फडणवीस सरकारमध्येही असा प्रकार झाला. दमानिया यांनी भुजबळ यांच्या मरीन लाईनसह विविध ठिकाणच्या बेनामी इमारतींवर आणि कन्स्ट्रक्शन कंपन्यांवर तक्रारी दाखल केल्या होत्या, मात्र हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशांमुळे त्यांना दिलासा मिळाला. तरीदेखील 2023-24 मध्ये मिळालेल्या या सवलतीनंतर आता पुन्हा चौकशी सुरू झाली आहे. लोणावळा, बांद्रा, तसेच मरीन लाईनवरील संपत्ती बेनामी व्यवहारांतर्गत येते असा आरोप करून दमानिया यांनी फडणवीस सरकार आता खरंच कारवाई करणार का आणि भुजबळांना मंत्रीपदावरून दूर करणार का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
Mumbai Live : भांडुपमध्ये पुन्हा घरफोडीची वाढ, हॉटेल दक्षिण भारतातून रक्कम लंपासभांडुप परिसरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पहाटे चारच्या सुमारास LBS मार्गावरील हॉटेल दक्षिण भारत येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम लंपास केली. चोरी करतानाचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, भांडुप पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांत या भागात घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Jalgaon live : चाळीसगावमध्ये आरक्षणासाठी बंजारा समाजाने काढला मोर्चाजळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात बंजारा समाजाने आरक्षणासाठी भव्य मोर्चा काढला. हैदराबादच्या धर्तीवर एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. या मोर्चात पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत यापेक्षा मोठा मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
Parabhani Live : जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते परभणीत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटपपरभणी येथे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जुने आणि नवीन असे न करता दोन्हीसाठी एकच निकष लावून प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे लाभार्थ्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले.
Nanded Live : मुखेडमध्ये भीषण अपघात, 8 जण जखमीनांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात बाऱ्हाळी नाका परिसरात भीषण अपघात झाला. ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने त्याने काळी-पिवळी जिपला जोरदार धडक दिली तसेच पाच ते सहा मोटरसायकलींना चिरडले.
या अपघातात सात ते आठ जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे.
Beed Live : बीडमधून बीड - आहिल्यानगर रेल्वे धावली, मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडाबीडमधून बीड - आहिल्यानगर रेल्वे धावली
बीडवासियांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड- आहिल्या नगर रेल्वेचे उद्घाटन.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा.
Nashik live : ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्व.मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक* ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्व.मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक..
* नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक
* शालिमार कार्यालयाबाहेर शिवसैनिकांचे निषेध आंदोलन..
* आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी
* नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक
Uddhav Thackeray Live : उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल, मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणीउद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंकडून मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी
शिवसैनिकांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची स्वच्छता
Shirur LiveUpdate : ओढ्याच्या पुलावरून वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडलाशिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे कामिनी ओढ्याच्या पुलावरून वाहून गेलेला तरुणाचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला सूरज अशोक राजगुरू असे तरुणाचे नावस्थानिक प्रशासन, पोलिस आणि आपत्कालीन बचाव पथकाच्या सततच्या प्रयत्नांनंतर हा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
Beed LiveUpdate: बीड-अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभअजित पवारांनी रेल्वेमंत्र्याचे आभार मानले आहे.
Omraje Nimbalkar Live : खासदार ओमराजे निंबाळकरांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक; जनसंपर्कात अडथळाखासदार ओमराजे निंबाळकर यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्यांचे व्हॉट्सअॅप अकाउंट बंद असून, या प्रकरणाची त्यांनी पोलिस आणि प्रशासन दरबारी तक्रार केली आहे. अकाउंट बंद राहिल्याने त्यांचा जनतेशी असलेला थेट संवाद खंडित झाला असून, त्यामुळे ते हतबल झाल्याचे त्यांनी व्यक्त केले आहे.
निंबाळकर यांनी आरोप केला आहे की, विरोधकांनी ठरवून त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर रिपोर्ट करून हे कटकारस्थान रचले आहे. सोशल मीडिया बंद करून त्यांच्या जनसंपर्कात अडथळा आणण्याचा प्रयत्न होत असून, सरकारविरोधी भूमिका घेतल्यामुळे लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Beed Live: बीड अहिल्यानगर रेल्वे धावलीअनेक दशकांपासूनच बीड वासियांचे रेल्वेचे स्वप्न अखेर आता पूर्ण झाल असून आज बीड अहिल्यानगर हा पहिला टप्पा रेल्वेने पूर्ण केला असून आज बीड मधून रेल्वे अहिल्यानगर कडे धावली आहे गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेसाठी आतुरलेले बिडकर आज आनंद व्यक्त करत आहेत स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घा
Mumbai Live: २४ तासांच्या आत आरोपीला शोधा, राज ठाकरेंची पोलिसांकडे मागणीमीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज पहाटे लाल रंग फेकण्यात आला होता. त्यानंतर शिवाजी पार्कात एकच गोंधळ झाला. शिवसैनिक संतप्त झाले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या ठिकाणी भेट देत पाहणी केली. शिवसेना नेत्यांनी संपूर्ण घटना राज ठाकरेंना सांगितली. राज ठाकरे यांनी त्यानंतर पोलिसांसोबत संवाद साधला. पुतळ्यावर रंग टाकणाऱ्यांना २४ तासांच्या आतमध्ये शोधा, अशी विनंती राज ठाकरेंनी पोलिसांना केली आहे.
Manoj Jarange Patil: दसऱ्यानंतर वेगळ्या स्टाइलचं आंदोलन करणार, आरक्षणाबाबत मनोज जरांगेंचा इशाराआरक्षणावरून मनोज जरांगे यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. आरक्षण प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची फसवणूक झाली तर दसऱ्यानंतर वेगळ्या स्टाइलचं आंदोलन करण्यात येणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. तसेच जरांगे पाटलांनी सरकारला आरक्षणाच्या निकषांची श्वेतपत्रिका प्रकाशित करण्याची मागणी केली आहे.
Mumbai Live: राज ठाकरेंकडून मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणीमुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याची घटना घडली. यामुळे घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाने तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच सध्या राज ठाकरेंकडून मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी केली जात आहे.
Mumbai Live: मुंबईकरांवर पावसाळी आजारांचे सावट, मलेरिया, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या साथीच्या आजारांच्या आकडेवारीनुसार यावर्षी पावसाळ्याशी संबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे. मलेरिया आणि चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढत असून डेंग्यू आणि अनेक जलजन्य आजारांमध्ये गट वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे.जानेवारी ते सप्टेंबर १५ दरम्यान, मुंबईत ६,२७७ रुग्णांची नोंद झाली.
Mumbai Live: संजय गांधी उद्यानात पुन्हा धावणार 'वन राणी' टॉय ट्रेनसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची मिनी टॉय ट्रेन, प्रतिष्ठित वन राणी, चार वर्षांहून अधिक काळ रुळांवरून दूर राहिल्यानंतर सप्टेंबरच्या अखेरीस पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. १९७० मध्ये सुरू झाल्यापासून उद्यानातील सर्वात लोकप्रिय आकर्षणांपैकी एक असलेली ही सेवा मे २०२१ मध्ये तौकते चक्रीवादळामुळे तिच्या डब्यांचे आणि ट्रॅकचे गंभीर नुकसान झाल्यानंतर निलंबित करण्यात आली. मात्र आता ती सप्टेंबर महिन्याअखेरीस पुन्हा धावणार आहे.
Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अंबरनाथ दौराउल्हासनगर अंबरनाथ बदलापूर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आढावा बैठक
आगामी महापालिका निवडणुकी संदर्भात महत्त्वाची बैठक
शुक्रवारी राज ठाकरे यांचा अंबरनाथ मध्ये दौरा
अंबरनाथच्या पनवेलकर हॉलमध्ये कार्यक्रमचं आयोजन
महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना कार्यालयाच लोकार्पण सोहळा राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार
Raju Shetti Live : आलमट्टी धरणाच्या उंची वाढीवरून राजू शेट्टींचा कर्नाटक सरकारला इशाराRaju Shetti Live : आलमट्टी धरणाच्या उंची वाढीवरून राजू शेट्टींचा कर्नाटक सरकारला इशारा
अलमट्टी धरणाच्या उंची वाढीसाठी कर्नाटक सरकारच्या हालचालींवरून राजू शेट्टी संतापले
केंद्र सरकारने कर्नाटकला कडक शब्दात खडसावण्याची गरज
अलमट्टी धरणाची उंची वाढवणे कोल्हापूर आणि सांगलीच्या जीवावर उठणार आहे
महाराष्ट्र सरकार सह केंद्राने याला कडाडून विरोध करावा राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया
Mumbai Live : शिवाजी पार्क परिसरात तणावमीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर समाजकंटकाने रंग टाकल्याने ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. दरम्यान पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरात बंदोबस्त वाढवला असून तणावाचे वातावरण आहे.
Nashik Live : मनमाड–मालेगाव राष्ट्रीय महामार्गावर जळगाव ट्रक आणि मालवाहू कंटेनरचा भीषण अपघातनाशिक जिल्ह्यातील मनमाड–मालेगाव राष्ट्रीय महामार्गावर जळगाव चोंडी घाटाजवळ आयशर ट्रक आणि मालवाहू कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
Beed Live : अजित पवारांच्या ताफ्यासमोर तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न, बीडमधील प्रकारआज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अजित दादा बीडमध्ये आहेत दादांचा ताफा ध्वजारोहणासाठी पोलीस ग्राउंडकडे जात होता. यादरम्यान दोन तरुणांनी अचानक ताफ्याच्या समोर येत अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सदरील तरूण केज तालुक्यातील कुंभेफळ येथील आहेत. यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं यावेळी तरुणांनी न्याय द्या, न्याय द्या अजित दादा न्याय द्या अशा घोषणा दिल्या.
Marathwada Live : मराठवाड्यात आज कुणबी प्रमाणपत्रांच वाटपधाराशिव मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून कुणबी प्रमाणपत्राचे वाटप
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते चार कुणबी प्रमाणपत्राचे झाले वाटप
मुंडे अभिषेक व्यंकटेश, धाराशिव, प्रगती व्यंकटेश मुंडे, पूजा व्यंकटेश मुंडे, गणेश व्यंकटेश मुंडे सर्व राहणार धाराशिव यांना करण्यात आले वाट
Latest Marathi News Updates : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा गोंधळओबीसीवर अन्याय करू नका, असे म्हणत काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला संभाजीनगरमध्ये आले होते. ते भाषण करण्यासाठी उभे राहिले, त्यावेळी काही लोकांनी जोरदार राडा घातला अन् घोषणाबाजी केली.
Flood News : पूरस्थितीमुळे सिरसाळा-पोहनेर मार्ग तीन दिवसांपासून बंदसिरसाळा : मंडळात मंगळवारी (ता. १६) सायंकाळी जोरदार पावसाने पुन्हा हजेरी लावली. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून खरिपातील सर्वच पिके उद्ध्वस्त झाली आहेत. पूरस्थितीमुळे सिरसाळा-पोहनेर मार्ग तीन दिवसांपासून बंद आहे. अखिल भारतीय किसान सभेने पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व आर्थिक मदत देण्याची मागणी ॲड. अजय बुरांडे यांनी केली.
Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगावात आज अंत्यसंस्कारआंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व कोल्हापूरचे सुपुत्र पद्मश्री डॉ. शिवराम बाबूराव भोजे (वय ८३, रेवंता अपार्टमेंट, राजाराम रायफल्स परिसर) यांचे काल निधन झाले. ते दहा दिवसांपासून फुफ्फुसात जंतूंचा संसर्ग झाल्याने आजारी होते. त्यांना राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारातून बरे झाल्यानंतर त्यांना चार दिवसांपूर्वी घरी आणण्यात आले होते. काल दुपारी साडेचार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी उमा, मुली वर्षा, विद्या व वीणा असा परिवार आहे. आज (ता. १७) सकाळी दहा वाजता कसबा सांगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Nitin Gadkari : भूगाव येथील बाह्यवळण रस्ता तातडीने करा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निर्देशपुणे-पौड-कोलाड राष्ट्रीय महामार्गावरील भूगाव येथील बाह्यवळण रस्त्याच्या गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या कामाला अखेर गती मिळाली आहे. पुढील नऊ महिन्यांत या बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) दिले. त्यामुळे हिंजवडी, पिरंगुट, तसेच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
Birendra Saraf : राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामामुंबई : मराठा आरक्षणाच्या संदर्भातील हैदराबाद गॅझेटला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असताना या निर्णय प्रक्रियेशी संबंधित असलेले राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली. सराफ यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचे समजते. तथापि, राज्य सरकारच्या विनंतीचा मान राखत त्यांनी जानेवारीपर्यंत काम पाहण्याचे मान्य केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळावर आज 'यात्री सेवा दिवस' साजरा केला जाणारशाहू नाका : कोल्हापूर विमानतळावर उद्या, बुधवारी ‘यात्री सेवा दिवस’ साजरा केला जाणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक आनंददायी आणि संस्मरणीय बनवण्याच्या उद्देशाने विविध विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना विमानतळावर एक वेगळा आणि खास अनुभव घेता येणार आहे.
PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छादेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (17 सप्टेंबर 2025) 75 वा वाढदिवस (PM Modi Birthday) आहे. या निमित्याने देशासह जगभरातून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यात येत आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
Maharashtra Rain : अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल २१ लाख सहा हजार हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसानLatest Marathi Live Updates 17 September 2025 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (17 सप्टेंबर 2025) 75 वा वाढदिवस आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व कोल्हापूरचे सुपुत्र पद्मश्री डॉ. शिवराम बाबूराव भोजे (वय ८३, रेवंता अपार्टमेंट, राजाराम रायफल्स परिसर) यांचे आज निधन झाले. आज (ता. १७) सकाळी दहा वाजता कसबा सांगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल २१ लाख सहा हजार हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. मागील चार दिवसांतील मुसळधार पावसामुळे पाच लाख १३ हेक्टरवरील पिके पाण्याखाली आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भातील हैदराबाद गॅझेटला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असताना या निर्णय प्रक्रियेशी संबंधित असलेले राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोल्हापूर विमानतळावर आज, बुधवारी ‘यात्री सेवा दिवस’ साजरा केला जाणार आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..