विसर्जनातील सहकार्याबद्दल गौरव
मालाड, ता. १७ (बातमीदार) ः पोलिस जाणीव सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष रविसर फडणीस यांच्या आणि संजय शेकोकार यांच्या मार्गदर्शनाखाली खारदांडा येथे गणेश विसर्जन सोहळ्यावेळी पोलिसांना सहकार्य करण्यात आले. याबाबत संघाला पोलिसांनी आभार मानून गौरवले. वाहतुकीचे नियमन करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे या कार्यात पोलिसांना प्रभावी सहकार्य करण्यात आले. वांद्रे विभाग सहाय्यक पोलिस आयुक्त अधिकराव पोळ, खार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजिव धुमाळ, पोलिस निरीक्षक वैभव काटकर, दीपाली मरळे, प्रकाश मोरे यांच्या हस्ते पोलिस जाणीव सेवासंघाच्या खारदांडा पथकाला प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.