अक्षय शिंदे
जालना : जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाचा तडाखा बसत आहे. साधारण १५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा तब्बल ९३ हजार ७९३ हेक्टर वरील पिकांना फटका बसला आहे. जालना जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान घनसावंगी तालुक्यामध्ये झाले आहे.
राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने प्रचंड हानी झाली आहे. प्रामुख्याने शेती पिकांना याचा अधिक फटका बसला आहे. मुसळधार पावसाने शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. जालनाजिल्ह्यात देखील १५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली असून यात कपाशी, सोयाबीन, तूर यासह फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
Dharashiv : मुसळधार पावसाने नद्यांना महापूर; चांदणी नदीच्या पुरात तरुण वाहिला, पोलिसांना वाचविण्यात यशनुकसानीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता
जिल्ह्यात नुकसानीबाबत कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात आकडेवारी समोर आली आहे. जालना जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा जालना जिल्ह्यातील ९३ हजार ७९३ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. सध्या प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात येत असून बाधित क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Accident News : नाईट ड्युटी करून घरी परतताना काळाची झडप; स्कूल व्हॅनच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू, संतप्त जमावाने फोडले वाहनओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
दरम्यान काढणीला आलेल्या सोयाबीन, मूग या पिकांचं अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार घनसावंगी तालुक्यात ४१ हजार २९ हेक्टर क्षेत्र, अंबड तालुक्यात २३ हजार ९८६ हेक्टर, जालना तालुक्यात २६ हजार १७१ हेक्टर आणि बदनापूर तालुक्यात २ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रांवर नुकसान झाले आहे. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहे.