लाडकी बहीण योजनेतून सव्वा लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. यात तुमचं नाव तर नाही ना? लगेच चेक करा!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या अर्जांची मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरु आहे.
अर्ज पडताळणीत लाखो महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत. संपूर्ण राज्यभरात सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये 1 लाख 24 हजार 937 महिलांना योजनातून बाद करण्यात आले आहेत.
पहिला टप्पा : वयोमर्यादेत न बसणाऱ्या 40,228 महिलांचे अर्ज अपात्र ठरले.
दुसरा टप्पा : एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्याचे आढळल्याने 84,709 अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
जवळच्या महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधा किंवा अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासा.
अपात्र महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही. आजच तुमची अर्ज स्थिती तपासा.