Pune News : कोथरूड परिसरात काल रात्री घडलेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याच्या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. घायवळ टोळीच्या गुंडांनी एकाच रात्री दोन जणांवर हल्ला करून परिसरात दहशत पसरवली. या हल्ल्यांमध्ये निलेश घायवळ टोळीचं नाव समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
पुण्यात बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घायवळ टोळीच्या चार गुंडांनी दोन गाड्यांवरून येत प्रकाश धुमाळ याच्यावर गोळीबार केला. "आम्ही इथले भाई आहोत," असे ओरडत त्यांनी एक गोळी फायर केली, जी धुमाळ यांच्या मांडीवर लागली. याच रात्री, त्याच टोळीने वैभव साठे याच्यावर कोयत्याने क्रूर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या दोन्ही घटनांनी परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
दरम्यान, यापूर्वी कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि भाजपचे आमदार राम शिंदेयांचा जामखेड येथील नागेश्वराच्या यात्रेत सोबत फिरतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. राम शिंदे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. याअनुषंगाने रोहित पवार यांनी आता थेट राम शिंदे यांना टार्गेट केले आहे.
Varsha Bungalow news : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात डबल बेड मॅट्रेस, सोफ्यासाठी 20.47 लाख खर्च? रोहित पवारांचा दावा किती खरा?रोहित पवार यांनी याबाबत सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे ज्या गुंडाला राजरोसपणे विधानभवनात घेऊन फिरतात त्याच्या टोळीने गाडीला साईड न दिल्याच्या रागातून पुण्यात (कोथरुड) भर रस्त्यात गोळीबार करून एका वाहनचालकाला जखमी केलं आहे.
Election Commission News : राहुल गांधींच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगानेच केला धक्कादायक खुलासा; FIR ची दिली माहिती...आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या गुंडाच्या टोळीवर काय कारवाई करतात की हा गुंड विधानपरिषदेच्या सभापती महोदयांचा खास माणूस आहे, म्हणून त्याला हमखास पाठीशी घालतात, हेच पहायचंय! या कारवाईनंतर हे सरकार सामान्य माणसाचं आहे की गुंडांचं हे कळणार आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.