Donald Trump: टॅरिफचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंगलट, अमेरिकन नागरिकांनी दिला सर्वात मोठा दणका
GH News September 19, 2025 06:16 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. त्यांनी जगभरातील बहुतांशी देशांवर कर लादला आहे. त्यामुळे त्यांना जगभरातून टीकेचा सामना करावा लागल आहे. मात्र आता अमेरिकन नागरिकांनीही डोनाल्ड ट्रम्प यांना, सर्वात मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता कमी होताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला 242 दिवस झाले आहेत. या काळात त्यांची नेट अप्रूवल रेटिंग -17% पर्यंत घसरली आहे. यामागे टॅरिफ हे सर्वात मोठे कारण आहे. तसेच परराष्ट्र धोरण, कडक इमिग्रेशन धोरणे, नोकर कपातीमुळेही नागरिक नारज आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता घटली

द इकॉनॉमिस्टने सादर केलेल्या एका अहवालानुसार, गेल्या आठवड्याच्या तुलनेत ट्रम्प यांची लोकप्रियता 2.6 अंकांनी कमी झाली आहे. सध्या अमेरिकेतले फक्त 39% लोक ट्रम्प यांच्या कामावर खुष आहेत, तर 56 % लोक त्यांच्या कामगिरीवर नाराज आहेत. तसेच 4 टक्के लोकांनी ट्रम्प यांच्या कामगिरीवर उघड भाष्य केलेले नाही.

अमेरिकन नागरिक नाराज

ट्रम्प यांच्या नऊ महिन्यांच्या कार्यकाळात अमेरिकन सरकारमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यांच्या आदेशांमुळे त्यांनी व्यापार करार, इमिग्रेशन धोरण, कर्मचारी वर्ग आणि परराष्ट्र धोरणात मोठे बदल सुरू केले आहेत. तसेच ट्रम्प यांनी आपल्या भाषणांमुळे आणि न्याय विभागाद्वारे अमेरिकन विद्यापीठे, न्यायाधीश आणि वकील, मीडिया आणि इतर क्षेत्रावरही नकारात्मक परिणाम झालेला आहे. ही धोरणे आणि आक्रमक शैली अमेरिकन जनतेच्या नाराजीचे कारण आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता घटलेली आहे.

टॅरिफमुळे अमेरिकेत महागाई वाढली

ट्रम्प यांनी सत्ता हातात घेताच टॅरिफवर लक्ष केंद्रित केले होते. व्यापारातील असंतुलन कमी करण्याची आणि अमेरिकन व्यवसायांना चालना देण्यासाठी त्यांनी जगभरातील देशांवर टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका आणि भारतात मोठ्या प्रमाणात व्यापार होत असते, मात्र अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला आहे. याटॅरिफमुळे अमेरिकेत जाणारी भारतीय उत्पादने महागली आहेत. यामुळे अमेरिकन लोकांमध्ये नाराजी पसरली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.