अल्बेनियाने जगातील पहिल्या एआय (AI) मंत्र्याची नियुक्ती केली आहे. ज्याचं नाव डिएला (Diella) आहे. डिएला ही एक अर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे. अल्बेनियाच्या नॅशनल एजेंसी फॉर इंफॉर्मेशन सोसायटीने मायक्रोसॉफ्टच्या मदतीने डिएला या अर्टिफिशियल इंटेलिजेंसला विकसीत केलं आहे. सध्या या एआय मंत्र्यांची जगभरात चर्चा सुरू आहे. भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी AI मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा दावा अल्बेनियाच्या प्रशासनाने केला आहे.
दरम्यान अल्बेनियाच्या एआय मंत्री डिएलाने पहिल्यांदाच संसदेमध्ये भाषण केलं आहे. डिएलाचं हे भाषण देखील प्रचंड गाजलं आहे. यावेळी बोलताना डिएलाने म्हटलं की, विरोधी पक्ष माझी नियुक्ती ही अवैध असल्याचं वारंवार सांगत आहेत. त्यांचं म्हणण आहे की मी फक्त मानवाच्या मदतीसाठी आहे, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही थेट माणसांच्या जागी एका AI ची नियुक्ती कराल. मात्र मी त्यांना सांगू इच्छिते की, मी इथे कोणाचीही जागा घेण्यासाठी आलेली नाहीये.
डिएलाचा नेमका अर्थ काय?
अल्बेनियन भाषेत डिएलाचा अर्थ सूर्य असा होतो.अल्बेनियाच्या नॅशनल एजेंसी फॉर इंफॉर्मेशन सोसायटीने मायक्रोसॉफ्टच्या मदतीने डिएला या अर्टिफिशियल इंटेलिजेंसला विकसीत केलं आहे. त्यानंतर अल्बेनियन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, अल्बेनियन सरकारने डिएलाला पारंपारिक वेशभूषेचा टच देत तिची नियुक्ती खरेदी, विक्री व्यवहार मंत्रिपदी केली आहे. याची घोषणा संसदेमध्ये करण्यात आली होती. या एआय मंत्र्याचा चेहरा अल्बेनियन अभिनेत्री अनिला बिशा यांच्या चेहऱ्याशी मिळता -जुळता आहे. अल्बेनिया हा देश आता लवकरच युरोपीयन संघात जाऊ शकतो, मात्र यामधील सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे या देशात सुरू असलेला भ्रष्टाचार.
अल्बेनिया या देशात सध्या प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे, आणि हाच भ्रष्टाचार संपवण्यासाठी आता अल्बेनियाने मोठा निर्णय घेतला आहे, त्यांनी थेट एआय मंत्र्याची नियुक्ती केली आहे. आता हा निर्णय कितपत बरोबर किंवा चूक आहे, हे येणाऱ्या काळात कळेलच.