केंद्र सरकारने अलिकडे गुड्स एण्ड सर्व्हीसेस टॅक्स (GST)दर आणि कंपेन्सेशन सेस समाप्त करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाने नवी कारच्या किंमत बहुतांशी सेगमेंट्समध्ये कमी झाल्या आहेत. आणि जवळपास सर्वच पॅसेंजर व्हेकईल ( PV ) निर्मात्यांनी याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहचवण्याची घोषणा केली आहे. नव्या कारमध्ये हा दिलासा स्पष्ट दिसत आहे. तर जुन्या प्री-ओन्ड म्हणजे सेंकड हॅण्ड कार देखील स्वस्त झाल्या आहेत.
देशातील काही प्रमुख प्री-ओन्ड कार बिझनसमधील कंपन्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवरील जुन्या कार खरेदीवर सूट देण्याची घोषणा केली आहे. ज्यात स्पिनी ( Spinny )आणि कार्स 24 (Cars24) सारख्या ब्रँड्सचा समावेश आहे. ग्राहकांनी सणासुदीत केवळ नव्याच नव्हे तर जुन्या कारच्या खरेदीवरही सुट मिळणार आहे.
स्पिनीने म्हटले आहे की जरी जुन्या कारच्या जीएसटी स्ट्रक्चरमध्ये कोणताही बदल झाला नसला तर पारदर्शकता आणि ग्राहकांचा विश्वास काय राखण्यासाठी कंपनीच्या किंमती कपात करीत आहोत. स्पिनीकडून जुन्या कार विकत घेणाऱ्यांना तातडीने सूट मिळणार आहे. कंपनीच्या लिस्टेड किंमतीवर कमाल 2 लाखांपर्यंतची सुट मिळणार आहे.ही ऑफर 22 सप्टेंबर रोजी नवा जीएसटी रेट्स लागू होण्याआधीच लागू झाली आहे.
दुसरीकडे आपली जुनी कार विकणाऱ्यांना देखील फायदा मिळणार आहे. कंपनीने सांगितले की वाढती मागणी आणि रिसेल व्हॅल्यूमुळे त्यांना प्रति कार 20,000 पर्यंत अतिरिक्त फायदा होऊ शकतो.
प्री-ओन्ड कार प्लॅटफॉर्म ‘कार्स 24’ ने देखील कँपेन अंतर्गत ‘Guaranteed Savings Time’नुसार ग्राहकांना थेट जीएसटी रिलीफचा लाभ दिला आहे. आता कार्स 24 वर उपलब्ध जुन्या कारच्या किंमतीमध्ये कमाल 80,000 पर्यंत घसरण झाली आहे. यामुळे कारची ओनरशिप आणखी किफायतदार झाली आहे.
मारुती सुझुकी स्विफ्ट, हुंडई i20, होंडा सिटी, टाटा नेक्सॉन, हुंडई क्रेटा आणि किया सेल्टॉस सारख्या मॉडल्सच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. या सर्व कार आता आधी पेक्षा कमी किंमतीत या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
एकीकडे कार खरेदीदारांसाठी दिलासा मिळत असताना कार्स 24 ने विक्रेत्यांना सावधान देखील केले आहे. पुढे जाऊन नव्या टॅक्स स्लॉटमुळे पुढे जाऊन कारच्या रिसेल व्हॅल्यूत देखील घट होऊ शकते. त्यामुळे ज्यांना आपली कार विकायची आहे. त्यांच्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सरकारच्या नव्या टॅक्स रचनेमुळे सर्व सेगमेंट्सच्या कार स्वस्त झाल्या
लहान कार ( 4 मीटरहून कमी, पेट्रोल 1200cc / डिझेल 1500cc पर्यंत )
आता केवळ 18% GST लागणार, जो आधी 28% होता.
आता यांच्या किंमती 5% ते 13% पर्यंत कमी होतील
मोठ्या कार ( 4 मीटरहून अधिक, मोठ्या इंजिनवाल्या )
आता यांच्यावर 40% GS जो आधी 28% + सेस होता.
एकूण कर भार घटल्याने यांच्या किंमती 3% ते 10% पर्यंत स्वस्त झाल्या आहेत.
लक्झरी ब्रँड्सच्या कारवर देखील लाभ
आधी 50% टॅक्स(28% GST + 22% सेस) द्यावा लागत होता
आता हा कमी होऊन फ्लॅट 40% झाला आहे.
एकूण पाहाता नव्या आणि जुन्या कार दोन्ही कारच्या किंमतीमध्ये दिलासा मिळाल्याने ग्राहकांना डबल बोनस होऊ शकतो. सरकारच्या निर्णयाने नवीन कार घेताना खिशाला जास्त भार नाही. तसेच प्री-ओन्ड बिझनस प्लॅटफॉर्मने पुढाकार घेऊ जुन्या कारना देखील स्वस्त केले आहे.