ग्राऊंड क्लिअरन्समध्ये ‘बाप’; या कारवर ग्राहक फिदा, किंमत 10.70 लाखांपासून पुढे
GH News September 19, 2025 06:16 PM

Top 7 Ground Clearance Cars : भारतात कार खरेदी करते वेळी ग्राऊंड क्लिअरन्स फार महत्त्वाचा मानल्या जातो. चांगला ग्राऊंड क्लिअरन्स असलेल्या कारची मोठी मागणी आहे. चांगल्या ग्राऊंड क्लीअरन्सच्या कार खराब रस्ते, खड्डेमय रस्ते आणि गावाकडील रस्त्यांसाठी एकदम चांगल्या मानल्या जातात. जे लोक शहरासह ग्रामीण भागात अथवा डोंगराळ भागात राहतात त्यांच्यासाठी या कार म्हणजे एकदम खास आहेत.

टोयोटा लँड क्रूझर – 235 मिमी

टोयोटा लँड क्रूझर एक आलिशान एसयुव्ही आहे. या कारचे ग्राऊंड क्लिअरन्स 235 मिमी आहे. ही कार शहरासह ग्रामीण भागात, जंगलात सहज घेऊन जाता येते. मजबूत इंजिन आणि शानदार डिझाईन ही या कारची वैशिष्ट्ये आहेत. या कारची किंमत जवळपास 2.10 कोटींपासून सुरू होते. यामध्ये 3.3 लिटर डिझेल वा 4.0 लिटर पेट्रोल इंजिन, 10-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स, 7 एयरबॅग्स, आणि ॲप्पल कारप्ले सारखे फीचर मिळतात.

फोर्स गुरखा – 233 मिमी

फोर्स गुरखा एक ऑफ-रोड एसयुव्ही आहे. इसकी ग्राउंड क्लियरनन्स 233 मिमी आहे. ही कार डोंगराळ आणि जंगलासाठी योग्य मानल्या जाते. या कारची किंमत 15.10 लाख रुपयांपासून सुरू होणार आहे. यामधये 2.6 लिटर डिझेल इंजिन, 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, ड्युएल एअरबॅग्स आहेत.

महिंद्रा थार – 226 मिमी

महिंद्रा थार एक लोकप्रिय ऑफ-रोड एसयुव्ही आहे. या कारचे ग्राऊंड क्लिअरन्स 226 मिमी आहे. ही कार स्टाईलिश आणि दमदार आहे. या कारची किंमत 11.25 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 2.0 लिटर पेट्रोल वा 2.2 लिटर डिझेल इंजिन आहे.

टोयोटा फॉर्च्यूनर – 225 मिमी

टोयोटा फॉर्च्यूनर एक चांगली एसयुव्ही आहे. या कारचे ग्राऊंड क्लिअरन्स 225 मिमी आहे. या कारची किंमत 33.43 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारचे इंजिन 2.8 लिटर डिझेल वा 2.7 लिटर पेट्रोल इंजिन, 6-स्पीड गियरबॉक्स, आणि 7 एअरबॅग आहेत.

होंडा एलिवेट – 220 मिमी

होंडा एलिवेट एक नवीन क्रॉसओवर एसयुव्ही आहे. या कारचे ग्राऊंड क्लिअरन्स 220 मिमी आहे. या कारची किंमत 11.57 लाख रुपयांपासून सुरू होती. या कारमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन, 6-स्पीड मॅन्युअल, सीव्हीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि 6 एअरबॅग्स आहे.

मारुती सुझिकी जिम्नी – 210 मिमी

मारुती सुझुकी जिम्नी एक छोटी पण दमदार ऑफ रोड कार आहे. या कारचे ग्राऊंड क्लिअरन्स 210 मिमी आहे. या कारची किंमत 12.74 लाख रुपयांपासून सुरु होते. यामध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन, 5-स्पीड मॅन्युअल वा 4-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स, आणि 6 एयरबॅग आहे.

मारुती सुझुकी ग्रँड व्हिटारा – 210 मिमी

मारुती सुझुकी ग्रँड व्हिटारा एक एसयुव्ही ही शहर आणि ऑफ रोडसाठी चांगल्या आहेत. या कारची ग्राऊंड क्लिअरन्स 210 मिमी आहे. या कारची किंमत 10.70 लाख रुपयांपासून सुरू होती. यामध्ये 1.5 लिटर पेट्रोल, हायब्रिड वा सीएनजी इंजिन आणि 6 एअरबॅग आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.