Gold And Silver Rate : आता सणासुदीचे दिवस चालू झाले आहेत. दुर्गा पूजेनंतर दिवेळी आणि धनत्रयोदशी आहे. त्यामुळे या काळात सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्याची परंपरा आहे. पण सध्या सोने आणि चांदीचा भाव पाहता यावेळी लोक या दोन मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. असे असतानाच आता सामान्यांना दिलासा देणारे काही अनुमान समोर आले आहेत. आगामी काळात सोन्याचा भाव कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करण्याची परंपरा लोकांना जपता येणार आहे.
दोन दिवसांत सोन्याचा भाव घसरलागेल्या वर्षभरात सोन्याचा भाव तब्बल 46 टक्क्यांनी वाढला आहे. विशेष म्हणजे फक्त याच वर्षी सोन्याचा भाव 40 टक्के वाढला आहे. एका वर्षाआधी 24 कॅरेट सोन्याचा भावा साधारण 75 हजार रुपये होता. आता हाच भाव तब्बल 1 लाख 10 हजारांच्याही पुढे गेला आहे. सध्या मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचा भाव घसरताना दिसतोय. गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव साधारण 500 रुपयांनी कमी झाला आहे.
चांदीच्या भावातही झाली घसरणIBJA च्या माहितीनुसार गुरुवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,10,869 होता. म्हणजेच मंगळवारच्या तुलनेत सोने 1600 रुपयांनी कमी झाले आहे. हीच बाब चांदीच्या बाबतीतही लागू आहे. 17 सप्टेंबर रोजी एक किलो चांदीचा भाव 125756 रुपये होता. आता गुरुवारी हाच भाव 125563 रुपयांपर्यंत घसरला आहे. 16 सप्टेंबर रोजी हा भाव 129300 एवढा झाला होता. म्हणजेच दोन दिवसांत चांदी तब्बल 3500 रुपयांची स्वस्त झाली आहे.
सोने स्वस्त होण्याचे कारण काय?मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली आहे. याच कारणामुळे भारतात सोने आणि चांदीचे भाव घसरले आहेत. दुसरीकडे अमेरिकेने लागू केलेल्या टॅरिफचाही परिणाम दागिन्यांवर पडतो आहे. अमेरिकेने ज्या पद्धतीने व्याजदरात कपात केली आहे, त्याच पद्धतीने भविष्यातही ही कपात होण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या मते आगामी काळात सोने आणि चांदीच्या भावात साधारण 10 टक्क्यांनी घट होऊ सकते. म्हणजेच सोने हे एक लाख रुपयांच्या (प्रति 10 ग्रॅम) आसपास मिळू शकते.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)