Raigad News: प्रामाणिक व कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी यांची बदली थांबवण्यासाठी एकवटले गावकरी; गटविकास अधिकाऱ्यांना दिले शेकडो सह्यांचे निवेदन
esakal September 19, 2025 11:45 PM

-अमित गवळे

पाली : काहीवेळा सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यप्रणालीवर लोक नाराज असतात. मात्र सुधागड तालुक्यातील पाच्छापूर गावात वेगळी परिस्थिती अनुभवास येत आहे. ग्रुप ग्रामपंचायत पाच्छापूर येथील प्रामाणिक व कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी यांची बदली थांबवण्यासाठी गावकरी एकवटले गावकरी आहेत. गावकऱ्यांनी सुधागड गटविकास अधिकाऱ्यांना शेकडो सह्यांचे निवेदन दिले आहे.

Success Story:'विशाल केंजळेंची एमपीएससीमधून यशाला गवसणी'; जिद्दीच्या जाेरावर ११ वेळा सरळसेवा परीक्षेत सुयश, आई-वडिलांचे स्वप्न केलं पूर्ण

या निवेदनात म्हटले आहे की राहुल सुदाम कांबळे हे ग्रामपंचायत पाच्छापूर येथे सप्टेंबर 2019 पासून ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते त्यांचे काम अतिशय प्रामाणिक पणे करत आहेत. एकही दिवस गैरहजर न राहता आमच्या ग्रामपंचायत मध्ये कार्यालयीन वेळेत हजर असतात. आमच्या ग्रामपंचायत मधील लोकांची सर्व कामे वेळेत होतात. ते शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहचवून त्या योजनांचा लाभ लोकांना मिळवून देतात. राहुल कांबळे ग्राम विकास अधिकारी येथे आल्यापासून कोणाचे काम अडलेले नाही. ते आल्यापासून आमची ग्रामपंचायत रोज चालू असते त्यामुळे लोकांची कामे वेळेत होतात. त्यांच्या मुळे ग्रामपंचायत मधील कोणालाही त्रास झालेला नाही.

त्यानी कोणाचीही कामे कधी अडवलेली नाहीत. तसेच ग्रामपंचायत हद्दीतील कोणत्याही लोकांकडून आज पर्यंत कधीच कोणती आर्थिक लाभाची मागणी केली नाही अथवा कोणाकडून आर्थिक लाभ घेतला नाही. ते आम्हाला आमच्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत अधिकारी म्हणून हवे आहेत. आशा मागणीची व आशयाचे निवेदन सुधागड पाली गट विकास अधिकारी यांना पाच्छापूर ग्रामपंचायत हद्दीतील गावकऱ्यांनी दिली आहे.

Solapur Buddhist Protest : 'भारतीय बौद्ध महासभेचे साेलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन'; दीक्षाभूमीचे व्यवस्थापन द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे देण्याची मागणी

सदर ग्रामविकास अधिकारी हे अतिशय प्रामाणिक व कर्तव्यदक्षपणे आपले काम करत आहेत. याशिवाय येथील सरपंच यांच्या विरोधात गावकऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर याबाबत तक्रार केली असून 39/1 अंतर्गत कार्यवाही सुरू आहे. आणि आता अखेरची सुनावणी होणार आहे. अशावेळी ग्रामविकास अधिकारी यांची बदली होण्यासाठी काहीजण दबाव आणत आहेत. जर त्यांची बदली झाली तर कागदपत्रांमध्ये फेरफार होण्याची भीती आहे. त्यामुळे जर बदली झाली तर सर्व ग्रामस्थ सुधागड-पाली पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करतील.

उमेश तांबट, ग्रामस्थ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.