-अंकुश चव्हाण
कलेढोण: सांगली-भिगवण या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० मार्गात रूपांतर झाल्यानंतर रुंदीकरणाच्या कामास मोठी गती आली आहे. हा महामार्ग दहिवडी-कातरखटाव- मायणी-विट्यामार्गे पुढे जात आहे. यादरम्यान मायणी शहरातील मुख्य चांदणी चौक मल्हारपेठ-पंढरपूर रस्त्याला मिळतो. रस्ता रुंदीकरणात शासकीय व खासगी जागेतील दुकानगाळे, भाजी मंडईही येते. त्यामुळे रस्ता रुंदीकरणात दोन्ही बाजूकडील किती जागा, दुकान गाळे जाणार? याची मायणीत जोरदार चर्चा सुरू असून, नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने सातारा प्राधिकरणाकडे राज्यमार्गातील अनेक सोयीसुविधा पुरविण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.
Success Story:'विशाल केंजळेंची एमपीएससीमधून यशाला गवसणी'; जिद्दीच्या जाेरावर ११ वेळा सरळसेवा परीक्षेत सुयश, आई-वडिलांचे स्वप्न केलं पूर्णपुणे-बंगळूर राज्यमार्गाला पर्यायी रस्ता म्हणून केंद्र शासनाने पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांतून जाणारा राष्ट्रीय महामार्ग १६० चौपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे. हे काम प्रगतिपथावर असून, हे काम मायणी चांदणी चौकापर्यंत पोहोचले आहे. या कामामुळे चांदणी चौकातील वाहतूक विस्कळित होत असून, याच मार्गात खासगी व शासकीय जागेत दुकान गाळे, छोटी-मोठी झाडे उभी आहेत. मुख्य चौकातील रस्त्याच्या लांबीबाबत नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. त्यासाठी संबंधित ठेकेदाराने नागरिकांना विश्वासात घेण्याची मागणी केली आहे. र्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले, की मुख्य चौकापासून दोन्ही बाजूला शंभर मीटर अंतर सोडण्यात आले आहे. चौकातील कामास तूर्त सुरुवात न करता हे काम दोन्ही बाजूंनी पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.
रस्ता घेणार मोकळा श्वास
रस्त्याच्या रुंदीकरणामुळे चांदणी चौकाचा चेहरामोहरा बदलणार असून, हा रस्ता वाहतुकीस मोकळा होणार आहे. या मार्गावरील खासगी, शासकीय जागेतील दुकानगाळे काढण्यात येणार आहेत. दोन राज्यमार्गावर असणारा चांदणी चौकातील रस्ता मोकळा श्वास घेणार आहे.
रस्त्याच्या कामासाठी ग्रामसभेचा ठरावमायणी हद्दीत दोन्ही बाजूस एक मीटर रुंदीचा रस्ता दुभाजक काढावा.
रस्ता दुतर्फा स्ट्रीट लाइटचा समावेश रस्त्याच्या मध्यदुभाजकामध्ये करावा
मध्यभागी ट्रॅफिक आयलँड उभा करण्यात यावा.
चौकातील बांधकाम विभागाच्या जागेत वाहनतळ करावे.
रुंदीकरणाच्या कामात जी कामे कामे शासनाला कळवली आहेत, ती गावच्या सौंदर्य व विकासाच्यादृष्टीने महत्त्वाची आहेत. ती ठेकेदारांनी पूर्ण करावी, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलन करावे लागेल. आरआरएसएम इन्फ्रा प्रा. लि. कंपनीने मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
- सोनाली माने, सरपंच