एकता पेढांबकरना प्रथम क्रमांक
esakal September 20, 2025 05:45 AM

rat१९p३.jpgः
२५N९२५८४
चिपळूण ः स्पर्धेतील विजेत्या एकता पेढांबकर यांचा गौरव करताना सरपंच विजया पेढांबकर.

एकता पेढांबकर अव्वल
पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा ; सुर्वे द्वितीय
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः तालुक्यातील पेढांबे ग्रामपंचायतीतर्फे आयोजित पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत एकता पेढांबकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत या स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
पर्यावरणाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृतीकरिता पेढांबे ग्रामपंचायतीच्यावतीने गावात गणेशोत्सव कालावधीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी नियुक्त केलेल्या समितीने स्पर्धेत सहभागी झालेल्या कुटुंबांच्या घरी भेटी देऊन पाहणी केली होती. त्यानुसार या स्पर्धेत पेढांबकर यांनी प्रथम, विवेक सुर्वे यांनी द्वितीय, अथर्व खांबे यांनी तृतीय, कृष्णा सकपाळ यांनी चौथा तर साहिल घरट यांनी पाचवा क्रमांक मिळवला. स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी सरपंच विजया पेढांबकर, उपसरपंच विलास तांदळे, सदस्य शशिकांत शिंदे, राजेंद्र कदम, समीर पेढांबकर, ऋतुजा शिंदे आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.