पंतप्रधान नरेंद्र मोदी २० सप्टेंबर रोजी एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते भावनगर आणि लोथल येथे अनेक कार्यक्रमात सामील होतील आणि विकास योजनांचा शुभारंभ करतील. सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी भावनगरातील एका भव्य रोड शोमध्ये सामील होतील. सुमारे १.५ किलोमीटर लांबीच्या या रोड शोमध्ये ३० हजाराहून अधिक लोक सहभागी होतील अशी शक्यता आहे.
या रोड शोचे मुख्य आकर्षण ऑपरेशन सिंदूर, जीएसटीत दिलासा आणि आत्मनिर्भर भारताची थीम असणार आहे. रोड शोनंतर पंतप्रधान जवाहर मैदान येथे पोहतील तेथे ते एक विशाल सभेला संबोधीत करणार आहेत.
भावनगरला देणार मोठी भेटभावनगरात पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे १.५० लाख कोटी रुपयांच्या शिपिंग आणि समुद्री क्षेत्राशी संबंघित विभिन्न योजनांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. यासह ते भावनगरच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांहून अधिक योजनांची भेटही देतील. या योजनामुळे या भागात रोजगाराच्या संधी वाढतील आणि औद्योगिक कारभाराला नवी दिशा मिळणार आहे.
४५०० कोटी रुपयातून विकसित होणाऱ्या योजनाचा आढावायानंतर पंतप्रधान मोदी लोथलचा दौरा करतील.लोथल सिंधु खोऱ्याच्या संस्कृतीचा एक महत्वपूर्ण व्यापरी केंद्र होता. यास भारताच्या प्राचीन समुद्री शक्तीचे प्रतीक मानले जात होते. येथे पंतप्रधान मोदी राष्ट्री समुद्र वारसा परिसर (एनएमएचसी) योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतील. सुमारे ४,५०० कोटी रुपयांतून विकसित होत असलेली ही योजना पंतप्रधान मोदी यांच्या “विरासत भी, विकास भी” या दृष्टीकोणातून साकार होणारे एक महत्वाचे पाऊल आहे.
दुपारी १ वाजल्यानंतर पीएम मोदी एनएमएचसी परिसरात आता पर्यंत पूर्ण झालेल्या कामांची पाहणी करतील आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील.या प्रकल्पाचे उद्दिष्ट भारताच्या समृद्ध सागरी वारशाचे जतन आणि प्रदर्शन करणे आहे. हे पंतप्रधान मोदी यांनी प्राचीन वारशाचे जतन करण्यासाठी जाहीर केलेल्या “पंच प्राण” प्रतिज्ञेशी देखील जोडलेले आहे.