जळकोट : माळहिप्परगा ते पाटोदा खुर्द रस्त्यावर आलेल्या पुरात वाहून गेलेल्या रिक्षामधील प्रवासी विठ्ठल धोंडिबा गवळे यांची तीन तासांनी सुखरूप सुटका करण्यात आली.
करंजी झाडाच्या फांदीला तीन तास लटकून त्यांनी स्वतःचा जीव वाचवला आणि अखेर मदतीचा हात त्यांच्यासाठी धावून आला. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास माळहिप्परगा ते पाटोदा खुर्द रस्त्यावरील ओढ्यात आलेल्या अचानक पुरामुळे पाच प्रवाशांसह एक रिक्षा वाहून गेली.
प्रवाहाच्या तडाख्यात सापडलेल्या विठ्ठल गवळे यांनी आपल्या ताकदीने झाडाला पकडले. झाडावर थांबून त्यांनी तीन तास मृत्यूशी सामना केला.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते पंडित नामवाड व त्यांच्या मित्रांनी स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाच्या मदतीने विठ्ठल यांचा शोध सुरू केला. अखेर रात्री उशिरा विठ्ठल एका झाडाच्या फांदीवर थांबलेले आढळून आले.
Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवरनागरिकांनी जिवाची पर्वा न करता त्यांना सुखरूप बाहेर काढले. विठ्ठल गवळे यांना तातडीने तहसीलदारांच्या वाहनातून त्यांच्या घरी पोचवण्यात आले. ही केवळ एक सुटका नव्हती, तर माणुसकी, जिद्द आणि धैर्याची कहाणी होती. दरम्यान, आमदार संजय बनसोडे यांनी गवळे कुटुंबाला भेट देत त्यांना धीर दिला.