गुगलवर विश्वासार्ह माहितीसाठी बीबीसीला बनवा पसंतीची वेबसाईट, असं वापरा नवीन फिचर
BBC Marathi September 20, 2025 09:45 AM
BBC

आता तुम्ही गुगलवर ताज्या, टॉप बातम्या मिळवण्यासाठी 'BBC.com'ला तुमच्या पसंतीचा सोर्स म्हणून जोडू शकता.

आपण कोणतीही माहिती शोधण्यासाठी गुगलवर सर्च करतो. युजर्सकडून त्यांच्या आवडत्या वेबसाईटवरील कोणतीही बातमी सुटू नये यासाठी आता गुगलनं सर्चमध्ये 'प्रीफर्ड सोर्स' म्हणजे 'पसंतीचा स्रोत' हे नवीन फीचर किंवा सुविधा सुरू केली आहे.

यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणिBBC.comसर्च करा. टॉप बातम्यांमध्ये विश्वासार्ह बातम्या मिळवण्यासाठीBBC.com ला सिलेक्ट करा.

https://www.google.com/preferences/source?q=bbc.com

BBC

'बीबीसी मराठी' ला गुगलवर पसंतीची वेबसाईट म्हणून जोडण्यासाठी पुढे दिलेल्या सूचनांचं पालन करा.

स्टेप 1: जेव्हा तुम्ही गुगलवर मराठीमध्ये कोणतीही बातमी शोधता, तेव्हा तुम्हाला 'टॉप स्टोरीज' सेक्शनमध्ये विविध वेबसाईटवरील नवीन बातम्या आणि लेख दिसतात.

तुम्ही भारतातील बातम्यांसाठी सर्च केल्यावर तुम्हाला पुढील स्क्रीनशॉट प्रमाणे दिसतं.

BBC

स्टेप 2: त्या सेक्शनमध्ये वरच्या बाजूला उजवीकडे असणाऱ्या बटणावर क्लिक करा. त्यामुळे तुमचा मेनू बार उघडेल आणि तुम्हाला तुमच्या पसंतीचा सोर्स टाकता येईल.

स्टेप 3: त्यात 'bbc.com' असं टाईप करा आणि उजवीकडे असणाऱ्या बॉक्सवर टिक करून तो निवडा.

त्यानंतर तुम्ही बीबीसी मराठीवरील आणखी बातम्या पाहण्यासाठी तिथे आलेल्या माहितीला रिलोड करू शकता.

पसंती सोर्स काय असतो आणि तो कशाप्रकारे उपयुक्त असतो?

गेल्या महिन्यात गुगलकडून एक ब्लॉग पोस्ट टाकण्यात आली होती. त्यात गुगल सर्चचे प्रोडक्ट मॅनेजर डंकन ओसबॉर्न यांनी उघड केलं होतं की सर्चमध्ये बातम्या शोधण्याचा अनुभव पसंतीच्या सोर्समध्ये कशाप्रकारे कस्टमाईज म्हणजे युजर्सच्या आवश्यकतेनुसार बदल करता येणार आहेत. यामुळे युजर्सना त्यांच्या आवडीच्या अधिक वेबसाईट पाहता येतील.

डंकन यांनी त्या पोस्टमध्ये दिलेली अधिक माहिती पुढील लिंकवर वाचता येईल.

https://blog.google/products/search/preferred-sources/

बीबीसी भारत आणि जगभरातील घडामोडींसंदर्भात अचूक, निष्पक्ष आणि स्वतंत्र पत्रकारिता करते. त्या बातम्यांवर तुम्ही विश्वास ठेवू शकता.

तुम्हाला जगाचं आकलन अधिक चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी बीबीसी नेहमी संपादनाच्या अतिशय उच्च दर्जाच्या मानकांनी काम करतं.

बीबीसीला पसंतीची वेबसाईट म्हणून निवडल्यानंतर तुम्हाला टॉप स्टोरीजमध्ये बीबीसीच्या अधिक बातम्या, लेख प्रामुख्यानं दिसू लागतील.

याव्यतिरिक्त, तुम्हाला बीबीसीच्या बातम्या तुमच्या फोनवर थेटपणे वाचता येण्याचे इतर मार्ग आहेत.

तुम्ही बीबीसी न्यूज मराठीच्या व्हाट्सअॅप चॅनेलला सबस्क्राईब करू शकता आणि त्यानंतर तुमच्या व्हॉट्सॲपवर तुम्हाला बातम्या थेटपणे मिळतील.

पुढील लिंकवर क्लिक करून बीबीसी न्यूज मराठी व्हॉट्सॲप सबस्क्राईब करा:

https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j

आम्हाला युट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर फॉलो करून तुम्हाला बीबीसी मराठीवरील सर्व व्हीडिओ आणि रील्सदेखील पाहता येतील.

इस्रायल-गाझा, रशिया-युक्रेन, पाकिस्तान, अमेरिका आणि जगभरातील रोजच्या आंतरराष्ट्रीय बातम्या इथे पाहा:

https://www.bbc.com/marathi/topics/c719d2enyn3t

बीबीसी मराठीवरचे व्हीडिओ इथे पाहाता येतील-

https://www.bbc.com/marathi/topics/cl29j0epz13t

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

  • 'मुलांवर विश्वासच राहिला नाही, मित्र-भाऊही नको वाटतात', बालपणीच्या लैंगिक शोषणाचा मनावर कसा होतो आघात?
  • सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील संरक्षण करार भारतासाठी मोठा झटका असल्याचं तज्ज्ञ का म्हणत आहेत?
  • भगवान विष्णू मूर्तीबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून वाद झाल्यानंतर सरन्यायाधीश गवई यांनी केली भूमिका स्पष्ट
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.