सांगली: शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याच्या आमिषाने एका महिलेची १३ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कविता विनोद चव्हाण (वय ४३, रा. भार्गव रेसीडन्सी, वखारभाग, सांगली, सध्या रा.कलानगर) यांनी सांगली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
Success Story:'विशाल केंजळेंची एमपीएससीमधून यशाला गवसणी'; जिद्दीच्या जाेरावर ११ वेळा सरळसेवा परीक्षेत सुयश, आई-वडिलांचे स्वप्न केलं पूर्णत्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सचिन सिद्धनाथ रोकडे (रा. झाशी कॉलनी, सांगलीवाडी), मिलिंद बाळासाहेब गाडवे (रा. रतनशीनगर, सांगली), अविनाश बाळासाहेब पाटील (रा. उमळवाड, ता. शिरोळ) आणि इरगोंडा बाबगोंडा पाटील (रा. मालगाव, ता. मिरज) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सन २०२० पासून आजवर अशा पाच वर्षांत त्यांनी फसवणूक केल्याची कविता चव्हाण यांची तक्रार आहे. संशयितांनी एसएस मार्क ट्रेडिंग नावाने कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत पैसे गुंतविल्यास त्याद्वारे शेअर बाजारातून तुम्हाला चांगला परतावा मिळेल असा आमिष त्यांनी कविता चव्हाण यांना दाखविले.
Smart Meter: मीटरचा हिशोब ‘स्मार्ट’ की फसवा?; वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त, दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात रांगागुंतवणुकीसाठी धनादेशाने १० लाख रुपये व रोखीने चार लाख रुपये असे एकूण १४ लाख रुपये घेतले.शेअर बाजारातत्याची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर सुरुवातीला चार महिने प्रति महिना २० हजार रुपयांप्रमाणे एकूण ८० हजार रुपयांचा परतावा दिला. त्यानंतर मात्र एकही पैसा दिला नाही. त्यामुळे चव्हाण यांनी पोलिसांत धाव घेतली.