शारदीय नवरात्री 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
या नऊ रात्रींमध्ये माता दुर्गेच्या नऊ रूपांचे पूजन करून भक्त समृद्धी, शांती आणि आनंदाची प्रार्थना करतात.
या सणाच्या निमित्ताने नातेवाईक आणि मित्रपरिवाराला भक्तीमय शुभेच्छा पाठवून उत्सवाचा आनंद द्विगुणित करा.
हिंदू धर्मात नवपारात्रीला खुप महत्व आहे. यंदा 22 सप्टेंबरला शारदीय नवरात्री साजरी केली जाणार आहे. या नऊ रात्रींच्या पवित्र काळात माता दुर्गेच्या नऊ रूपांचे पूजन करून भक्त आपल्या जीवनात समृद्धी, शांती आणि आनंद मागतात. शारदीय नवरात्र हा माता दुर्गाच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री साजरा होतो. या सणाच्या निमित्ताने नातेवाईक आणि मित्रपरिवाराला भक्तीमय शुभेच्छा पाठवून उत्सवाचा आनंद द्विगुणित करा.
सर्व मंगल मांगल्ये,
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गोर,
नारायणी नमोस्तुते,
तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवरात्रीच्या शुभेच्छा
नारी तू नारायणी
नारी तू सबला
तुझ्या तेजाने उजळे सृष्टी
नमितो आम्ही तुजला
तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
घटस्थापना घटाची,
नवदुर्गा स्थापनेची,
आतुरता आगमनाची,
आली पहाट नवरात्र उत्साहाची,
तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
अंबामातेची नऊ रूप तुम्हाला
किर्ती, प्रसिद्ध, आरोग्य, धन
शिक्षण, सुख,समृद्धी, भक्ती
आणि शांती देवो
तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या नऊ रात्रीला
करूया देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा
तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
शरद ऋतूत रंगे उत्सव नवरात्रीचा
आसंडून वाहू दे आपल्या आयुष्यात पूर
नाविन्य, आनंद आणि सुखाचा
शारदीय नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा!
नवरात्रीचे नऊ दिवस,
सण हा मांगल्याचा असो..
देवीची नऊ रूपे पाहून,
मन तिच्याच ठाय वसे
तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या मित्र-परिवाराला
आणि नातेवाईकांना
घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या
हार्दिक शुभेच्छा
घटस्थापना घटाची
नवदुर्गा स्थापनेची आतुरता आगमनाची
आली पहाट नवरात्र उत्सवाची
तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवरात्रीच्या या पावन प्रसंगी
आई जगदंबेचा कृपाशिर्वाद तुम्हास मिळू दे
तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!