- rat१९p१.jpg-
२५N९२५८२
रत्नागिरी ः कोल्हापूर-तिटवे येथे झालेल्या विभागीय युवा महोत्सवात यश मिळवणाऱ्या महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी.
‘कर्वे’चे युवा महोत्सावत यश
लोकनृत्य, पथनाट्यात चमक; ३८ विद्यार्थिंनीचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः कोल्हापूर जिल्ह्यातील तिटवे येथे नुकत्याच झालेल्या विभागीय युवा महोत्सवात शहराजवळील शिरगाव येथील महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरीच्या विद्यार्थिनींनी विविध कलात्मक, साहित्यिक व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. या महोत्सवात वेस्ट झोनमधून १४ महाविद्यालये सहभागी झाली होती. त्यात महर्षी कर्वेच्या ३८ विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन यश मिळवले.
युवा महोत्सवात लोकनृत्य प्रकारात द्वितीय क्रमांक, थिएटर प्रकारात सादर केलेल्या एकांकिकेला तृतीय, स्कीटमध्ये द्वितीय, पथनाट्यात द्वितीय, माईम प्रकारात उत्तेजनार्थ, हिंदी वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला आहे.
सफा काझी, मीरा सुर्वे, करूणा जाधव आणि तीर्था लिंगायत यांनी पारितोषिके मिळवली तसेच फाईन आर्टमध्ये ऑन दी स्पॉट पेंटिंग प्रकारात महाविद्यालयाची विद्यार्थिनी इशिका बाईंग हिने प्रथम क्रमांक पटकावला तसेच आर्या जाधवला कार्टूनिंगमध्ये उत्तेजनार्थ, कोलाजमध्ये प्रथम इशिका बाईंग, उत्तेजनार्थ तन्वी जडयार, रांगोळीत द्वितीय वेदिका विलणकर, उत्तेजनार्थ अमृता माने, क्ले मॉडेलिंगमध्ये युसरा सय्यद हिने प्रथम क्रमांक पटकावला. सानिका कदम, आयेशा मुल्ला यांनीही बक्षिसे मिळवली. फाईनआर्टचे सर्वसाधारण विजेतेपद महाविद्यालयाला मिळाले. या सर्व कामगिरीमुळे महर्षी कर्वेच्या विद्यार्थिनींनी कला, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील बहुमुखी प्रतिमेचा ठसा उमटवत युवा महोत्सवात महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. सर्व विद्यार्थिनींना सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. प्रतिभा लोंढे तसेच थिएटरसाठी मयूर साळवी, श्रेयश माईन, साहिल चरकरी व नृत्य दिग्दर्शक म्हणून रूपेश धाडवे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभारी प्राचार्या स्नेहा कोतवडेकर तसेच रत्नागिरी प्रकल्पाचे अध्यक्षा विद्या कुलकर्णी, प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई व अन्य पदाधिकारी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.