मनसेला कोल्हापूरात झटका बसणार असल्याची शक्यता
मनसेचे जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा
काही गोष्टींमुळे पक्षप्रवेशाचा निर्णय लांबणीवर
Maharashtra : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोल्हापूरात धक्का बसू शकतो अशी सध्या चर्चा रंगली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात आहे. पक्षप्रवेशाबाबत प्राथमिक स्तरावरील बैठका झाल्या आहेत. अटी आणि नियम यांच्यामुळे राजू दिंडोर्ले यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय लांबणीवर पडल्याचे म्हटले जात आहे.
Sudan Mosque Attacked : मशिदीवर ड्रोन हल्ला, नमाज पठण करताना ७० हून अधिक जणांचा मृत्यूकोल्हापुरातील प्रभागात प्रमुख दावेदार म्हणून राजू दिंडोर्ले यांच्याकडे पाहिले जात आहे. महायुतीकडून निवडणूक लढवण्यास झालेल्या प्रभागात त्यांची ताकद असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे राजू दिंडोर्ले यांना महायुतीच्या भारतीय जनता पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरु आहे, असे बोलले जात आहे. याबाबत भाजपमध्ये प्राथमिक स्तरावर चर्चा झाल्याचेही म्हटले जात आहे.
BJP : ऑफिसमध्ये आढळला भाजप नगरसेवकाचा मृतदेह, गळफास घेत आयुष्य संपवलं; कारण...राजू दिंडोर्ले हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडून भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. पण यावर भाजप किंवा मनसेच्या कोणत्याही नेत्याकडून किंवा पदाधिकाऱ्याकडून अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. या चर्चा सुरु असताना राजू दिंडोर्ले यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा सरकारनामाशी बोलताना त्यांनी 'मी कोणत्याच पक्षात जाणार नसून मनसेकडूनच निवडणूक लढवणार आहे', असे स्पष्टीकरण दिले.
Golden Data : बोगस लाभार्थीची खैर नाही! नागरिकांचा 'गोल्डन डेटा' तयार; सरकार काय कारवाई करणार?