सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात वाढ.
पुढेही सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता.
सणासुदीला ग्राहकांच्या खिशाला झळ.
सोन्याच्या दरात वारंवार बदल पाहायला मिळत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या दरामुळे सोन्यानं प्रति तोळा १ लाखांचा टप्पा पार केला आहे. अमेरिकन बँकांनी व्याजदरात कपात केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढलाय. दरम्यान, अमेरिकेनं भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्याचा थेट परिणाम सुवर्णनगरीला झाला असून, दररोज सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र आहे.
आज जळगाव शहरात १ तोळं सोन्याचा दर विक्रमी (GSTसह) १,१४,३०० रूपये इतका नोंदवला आहे. अल्पावधीत ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे निश्चितच ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. मात्र, नवरात्राच्या तोंडावर सराफ बाजार ग्राहकांनी गजबजून गेला आहे.
मृत्यूनंतर बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांसाठी होता खास मेसेज, नेटकऱ्यांचे डोळे पाणावलेग्राहक काही प्रमाणात वेट अँड वॉचच्या भूमिकेत जरी असले तरी, नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण तोंडावर आल्याने खरेदी टाळणे अनेकांसाठी शक्य होत नाही. त्यामुळे भाव वाढले तरी ग्राहकांचा ओघ कायम असल्याचे सुवर्णनगरीतील व्यवसायिकांनी सांगितले.
सातवीतल्या पोरीचं लग्न लावलं, नंतर जावयासोबत ठेवले अनैतिक संबंध, दोघांनी मिळून...बीडमध्ये चाललंय काय?जळगावमधील अग्रगण्य सुवर्णव्यवसायिकांच्या मते, अमेरिकन व्याजदर कपातीमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील या चढउतारांचा थेट परिणाम जळगाव बाजारपेठेवर होत असून, भावात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचं ते सांगतात. या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसणार, एवढं मात्र नक्की.