नामपूर: शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला दर वर्षी जाहीर होणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या घोषणेला यंदा पंधरवड्याचा विलंब झाला होता. राज्यातील पुरस्कारार्थींच्या नावांवर एकमत न झाल्याने हा अडथळा निर्माण झाला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर अखेर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
या घोषणेत नाशिक जिल्ह्यातील तब्बल पाच शिक्षकांचा समावेश असून, त्यांपैकी चार शिक्षक जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत आहेत, ही विशेष बाब आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षकांकमध्ये गजानन उदार (जिल्हा परिषद शाळा, मुंगसरे, ता. नाशिक), संजय येशी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फांगुळगव्हाण, ता. इगतपुरी), जगदीश खैरनार (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उभाडे, ता. इगतपुरी), शीतल पगार (जिल्हा परिषद आदर्श शाळा, मातोरी, ता. नाशिक), दत्तात्रय वाणी (माध्यमिक विद्यालय, पिंपरखेड, ता. दिंडोरी). राज्य सरकारने यंदा सात प्रवर्गांमधील १०९ शिक्षकांची निवड केली असून, त्यात प्राथमिक, माध्यमिक, आदिवासी क्षेत्रातील शिक्षक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, विशेष शिक्षक (कला/क्रीडा), दिव्यांग
जिल्ह्यातील पाच शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार शिक्षक आणि स्काउट-गाइड शिक्षकांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे, काही प्रवर्गांमध्ये शिक्षकांना समान गुण मिळूनही निश्चित संख्येअभावी त्यांची नावे घोषित होत नसत. यंदा मात्र अशा दोन शिक्षकांना ‘राज्य शिक्षक विशेष गुणगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा २२ सप्टेंबरला पार पडणार असून, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव आबासाहेब कवळे यांनी याबाबतची घोषणा केली.
Maratha Reservation : कुणबी नोंद असूनही वंशावळ सिद्ध करणे कठीण; गाव, आडनाव जुळले तरी जुन्या कागदपत्रांअभावी मिळेना जात प्रमाणपत्रप्रवर्गनिहाय पुरस्कारार्थी शिक्षकांची आकडेवारी
प्राथमिक (३८),
माध्यमिक (३९), आदिवासी क्षेत्र (१९), आदर्श शिक्षिका (८), विशेष शिक्षक कला/क्रीडा (२), दिव्यांग शिक्षक (१), स्काउट-गाइड (२).