वडगाव मावळ, ता. २० : नवरात्रीनिमित्त केशवनगर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ‘शारदीय नवरात्र महोत्सव २०२५’ आयोजित करण्यात आला असून, त्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजक योगेश म्हाळसकर यांनी दिली.
केशवनगर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीनिमित्त दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यावर्षी सोमवारी (ता. २२) सकाळी महापूजा व घटस्थापना; २३ ते २५ सप्टेंबरला मुलांसाठी व महिलांसाठी विविध स्पर्धा; शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी देवी कुंकू अभिषेक व दुर्गा सप्तशती जप; शनिवारी (ता. २७) दुपारी रांगोळी स्पर्धा; रविवारी (ता. २८) सायंकाळी पाककला स्पर्धा व दांडिया, सोमवारी (ता. २९) सायंकाळी वेशभूषा स्पर्धा व दांडिया; मंगळवारी (ता. ३०) सप्तशती महाष्टमी होम, सायंकाळी दांडिया स्पर्धा; १ ऑक्टोबरला सकाळी आयुध पूजन व सायंकाळी भोंडला, स्कूल डान्स व दांडिया स्पर्धा; २ आॅक्टोबरला सकाळी देवीची मिरवणूक होईल. ६ आॅक्टोबरला दुपारी महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम होईल, अशी माहिती अश्विनी म्हाळसकर यांनी दिली.
---