मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकलबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबई लोकल सेवा कोलमडली आहे. परिणामी गाड्या उशिराने धावत असून प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,पश्चिम रेल्वेमार्गावरील अंधेरी स्थानकात पॉईंट फेल्युअर झाल्याची घटना घडली. यामुळे अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवरील लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. या बिघाडामुळे लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.
विदर्भ, मराठवाडासह कोकणकरांसाठी गुडन्यूज! ९० हजार लोकांना मिळणार रोजगाराची संधी; मुख्यमंत्र्यांची घोषणादरम्यान, घटनेची माहिती मिळताच रेल्वेप्रशासनाने तांत्रिक दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले. त्याचबरोबर प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. तसेच प्रशासनाकडून प्रवाशांना धीर धरण्याचे आणि प्रवासाला अतिरिक्त वेळ राखून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेवर रात्रीचा ब्लॉकपश्चिम रेल्वेवर शनिवार (ता. २०) रोजी वसई रोड आणि विरार रेल्वे स्थानकादरम्यान रात्रीचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री १२.१५ ते रविवारी पहाटे ४.१५ वाजता या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल रद्द राहणार असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत. तर रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसेल, असे प्रशासनाने सांगितले आहे.