घरफोडी प्रकरणातील संशयित अटकेत
esakal September 22, 2025 03:45 PM

तलासरी, ता. २१ (बातमीदार) : तलासरी पोलिस ठाण्याच्या पथकाने दोन घरफोडी प्रकरणे उघडकीस आणत संशयित आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी तब्बल ११ मोबाईल, ११ हजारांची रोकड आणि मोटारसायकल असा सुमारे एक लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सोमवारी (ता. १५) हिरेमण खोटरे आणि पोलिस अंमलदार योगेश मुंढे गस्त घालत असताना, संशयास्पद हालचाल करणारा एक तरुण दुचाकीवर दिसला. त्याची अंगझडती घेतली असता सहा मोबाईल आढळले; मात्र वाहन व मोबाईलची कागदपत्र नसल्याने आणि समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव प्रेम सतीश दळवी (वय २०, रा. उधवा कासपाडा, ता. तलासरी) याने उधवा नवापाडा येथे घरफोडी करून मोबाईल चोरी, तसेच तलासरी पोलिस ठाण्यामधील चोरीसह अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी अधिक तपास केल्यावर त्याच्याकडे अजून मोबाईल सापडले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उल्हास पवार करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.