मुंबई : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (सुनील टाटकेरे) यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे हेही उपस्थित होते. धनंजय मुंडेंनी सुनील किनारपट्टी आधार मला वडिलांप्रमाणे असल्याचे म्हटले. तसेच, सुनील तटकरेंनी आम्हाला कायम मार्गदर्शन करत राहावं. चुकले तर कान धरावा…नाही चुकलं तर चालतं का?…पण आता रिकामं ठेवू नका…काहीतरी जबाबदारी द्या…अशी मागणीही धनंजय मुंडेंनी केली होती. त्यावरुनआता धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) राजकीय पुनर्वसनाची चर्चा रंगली आहे. आता, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांना प्रश्न विचारला असता त्यांनीही भूमिका मांडली, त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल, असे ते म्हणाले.
सुनील तटकरेंनी आम्हाला कायम मार्गदर्शन करत राहावं. चुकले तर कान धरावा…नाही चुकलं तर चालतं का?…पण आता रिकामं ठेवू नका…काहीतरी जबाबदारी द्या…अशी मागणी धनंजय मुंडे यांनी भर मंचावरुन केली. धनंजय मुंडेंच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. यावर सुनील तटकरेंनी दिली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडेंनी काहीतरी काम द्याअशी मागणी केली. तर, याबाबत वरिष्ठ योग्य निर्णय घेतील, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं. त्यानंतर, आता अजित पवारांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल, त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल, असे म्हणत अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेत दिले आहेत. दरम्यान, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांचे नाव आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर, काही काळ ते वैद्यकीय कारणास्तव सार्वजनिक कार्य्रकमापासून दूर होते. आता, ते पक्षाच्या कार्यक्रमात सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत कालपासून पाऊस होतोय, शेतीचं मोठं नुकसान झालं असून घरांचेही नुकसान झालंय. बीड जिल्ह्यात काही नागरिकांना एअरलिफ्ट करावं लागलं, बीड जिल्ह्यात हेलिकॉप्टर पाठवण्याचा प्रयत्न केला. अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न एअरलिफ्टने करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पूरग्रस्त भागात ग्रामस्थांच्या मदतीसाठी एनडीआरएफ-एसडीआरएफ देखील पोस्ट केले आहेत.
आता रिकामं ठेवू नका, काहीतरी काम द्या…; धनंजय मुंडेंची सुनील तटकरेंकडे मागणी, भर मंचावर काय घडलं?
आणखी वाचा