दिल्लीतील फर्शबझार येथील सराफ पेढीत पोलिस असल्याची बतावणी करून कोट्यवधींचा डल्ला मारणाऱ्या प्रशांत राजकुमार कदम (वय २५) आणि शुभम राजाराम कांबळे (वय २६) यांना दिल्ली व एलसीबी पोलिसांनी अटक केली.
संशयितांकडून १ किलो ४०० ग्रॅम सोन्याचे दागिने व बिस्किटे, ३ किलो चांदी आणि ११ लाख ९१ हजार रुपये रोकड असा एकूण १ कोटी ५६ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त झाला.
संशयित सांगली जिल्ह्यातील असल्याचे तांत्रिक तपासाद्वारे उघडकीस आले; त्यांना सांगलीत ताब्यात घेऊन चौकशी केली, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व लपवलेला मुद्देमाल पोलिसांना दिला; नंतर दिल्ली न्यायालयातून चार दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळाली.
Stolen Money Recovery Delhi : दिल्ली येथील एका सराफी पेढीत पोलिस असल्याची बतावणी करत कोट्यवधींचा डल्ला मारणाऱ्या दोघांना दिल्ली व एलसीबीच्या पोलिस पथकाने गजाआड केले. त्यांच्याकडून १ किलो ४०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटे, ३ किलो चांदी आणि ११ लाख ९१ हजारांची रोकड असा एकूण १ कोटी ५६ लाख २० हजारांचा ऐवज जप्त केला. संशयित प्रशांत राजकुमार कदम (वय २५ रा. सोनी) आणि शुभम राजाराम कांबळे (वय २६ रा. आरग सध्या कळंबी) अशी त्यांची नावे आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिल्ली येथील फर्शबझार येथे फिर्यादी विक्रम काबुगडे यांची सराफ पेढी आहे. १५ सप्टेंबर रोजी संशयित दोघेजण पोलिस असल्याची बतावणी करत त्यांच्या दुकानात शिरले. दुकानातील २० लाख रुपये रोकड, १ किलो ४०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटे, ३ किलो चांदी लुटून दुकानातील कामगारांचे अपहरण करत पलायन केले होते. याबाबतची नोंद दिल्ली पोलिसात झाली होती.
दिल्ली पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता संशयित हे सांगली जिल्ह्यातील असल्याचे निदर्शनास आले. यानंतर दिल्ली पोलिसांचे एक पथक सांगलीत दाखल झाले. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणला तपासाच्या व मदत करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, संशयित दोघांचा शोध घेत असताना दोघेजण कळंबी आणि सोनी गावात असल्याची माहिती मिळाली. यानंतर तातडीने दोघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. यानंतर त्यांनी लपवून ठेवलेला मुद्देमाल पोलिसांना काढून दिला.
यावेळी संशयित प्रशांत कदम आणि शुभम कांबळे या दोघांना दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केले. दिल्ली क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी न्यायालयात हजार केले असता त्यांना चार दिवसांची रिमांड मिळाली. यानंतर संशयित दोघांना ताब्यात घेत दिल्ली पोलिस रवाना झाले.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, दिल्ली क्राईम ब्रँचचे उपनिरीक्षक अमित चौधरी, शशिकांत यादव, उपनिरीक्षक कुमार पाटील, संदीप पाटील, अतुल माने, श्रीधर बागडी, सुशील मस्के, अभिजित माळकर, संकेत कानडे, ऋतुराज होळकर, पवन सदामते, विनायक सुतार, सुमित सूर्यवंशी, अभिजित पाटील, अजय पाटील, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली.
Kolhapur Crime : आठवर्षीय चिमुकलीचा दुर्गावतार, स्वत:च्या अपहरणाचा हाणून पाडला प्रयत्न; कोल्हापुरातील नांदणीमध्ये थरारक घटनाQ1: हा प्रकार कुठे आणि कधी घडला?
A1: ही घटना १५ सप्टेंबर रोजी दिल्लीतील फर्शबझार परिसरातील सराफ पेढीत घडली.
Q2: संशयितांची नावे आणि वय काय आहे?
A2: प्रशांत राजकुमार कदम (वय २५, रा. सोनी) आणि शुभम राजाराम कांबळे (वय २६, रा. कळंबी) हे संशयित आहेत.
Q3: संशयितांकडून काय जप्त झाले?
A3: १ किलो ४०० ग्रॅम सोन्याचे दागिने व बिस्किटे, ३ किलो चांदी आणि ११ लाख ९१ हजार रुपयांची रोकड – एकूण १ कोटी ५६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल.