H-1B Visa Exemption : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या एका निर्णयामुळे संपूर्ण जगावर परिणाम झाला असून सगळेच हादरले आहेत. ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या शुल्कात मोठी वाढ करण्याच निर्णय जाहीर केल्याने अनेकांच्या पोटात गोळा आला. त्यावरून अनेकांनी नाराजीही व्यक्त केली, मात्र वाढीव सुल्कामुळे अनेकांच्या मनात धास्ती होती. ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयानुसार, नव्या H-1B व्हिसाचे शुल्क वाढवून तब्बल 1 लाख डॉलर्स ( सुमारे 88 लाख रुपये) करण्यात आले. या शुल्कात भरमसाठ वाढ केल्याने अमेरिकेत जाण्याची, तेथे काम करण्याची स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा धक्का बसला. याच सर्वाधिक परिणाम भारताला बसेल अशाही चर्चा सुरू झाल्या, यामुळे जगात मोठा गोंधळ माजल्याचंही दिसून आलं.
मात्र आता याच H-1B व्हिसांसदर्भात एक महत्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे, या व्हिसाच्या नियमांसदर्भात ही माहिती येत आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ट्रम्प प्रशासन H-1B व्हिसाच्या वाढीव, शुल्कातून डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सूट देऊ शकतं. सध्या H-1B व्हिसाचे शुल्क वाढवून 1 लाख डॉलर्स करण्यात आले आहे, मात्र आता डॉक्टरांना त्यातून सूट मिळू शकते. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांकडून या संदर्भात संकेत मिळाल्याची माहिती मिळत आहे. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते टेलर रॉजर्स यांनी ब्लूमबर्ग न्यूजला दिलेल्या एका निवेदनात हे संकेत दिल्याते समजते. त्यामुळे डॉक्टरांना, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलवासा मिळू शकतो. 19 सप्टेंबर रोजी ट्रम्प यांनी व्हिसासंदर्भातील नव्या कायद्यावर स्वाक्षरी केली होती, त्यामुळे जगात गोंधळाचे वातावरण असतानाच, आता ही नवी अपडेट समोर येत आहे.
व्हिसा शुल्कात वाढ करण्याच्या ट्रम्प यांच्या घोषणेमुळे भारतातील आयटी क्षेत्रात खळबळ उडाली. भारत हा एच-1बी व्हिसाचा सर्वात मोठा वापरकर्ता आहे. मेयो क्लिनिक, क्लीव्हलँड क्लिनिक आणि सेंट ज्यूड हॉस्पिटलसह प्रमुख रुग्णालये एच-बी व्हिसावर अवलंबून आहेत. रिपोर्ट्सनुसार, मेयोकडे 300 हून अधिक मंजूर व्हिसा आहेत. त्यामुळे, भारतीय डॉक्टरांना या आधारावर व्हिसा शुल्कात सूट मिळू शकते.
डॉक्टरांची कमतरता निर्माण होण्याची शक्यता
प्रचंड व्हिसा शुल्कामुळे डॉक्टरांची कमतरता वाढेल असा इशारा अमेरिकन मेडिकल असोसिएशनने इशारा दिला होता.कारण अनेक अमेरिकन आरोग्य या यंत्रणा वैद्यकीय रहिवाशांची भरती करण्यासाठी H-1B व्हिसावर जास्त अवलंबून असतात. “घोषणापत्रात, संभाव्य सूट देण्याची परवानगी आहे. यामध्ये वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांचा समावेश असू शकतो,” असे व्हाईट हाऊसचे प्रवक्ते टेलर रॉजर्स म्हणाले. जर व्हिसा शुल्क कमी केले नाही तर अमेरिकेला वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता भासू शकते अशी भीती व्यक्त होत होती. मात्र ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर डॉक्टरांना व्हिसाच्या वाढीव शुल्कातून सूट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
H-1B व्हिसावर ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं काय ?
ट्रम्प प्रशासनाच्या एका निर्णयामुळे गेल्या आठवड्यापासून जगात खळबळ माजली. 21 सप्टेंबर रोजी किंवा त्यानंतर दाखल केलेल्या H-1B व्हिसाच्या नवीन अर्जांवर एक लाख डॉलर्सचे शुल्क आकारले जाईल असे ट्रम्प प्रशासनाने नमूद केले होते. हे फक्त एकदाच भराव लागेल आणि शुल्क मानले जाऊ नये. भारत आणि अमेरिका यांच्यात टॅरिफवरून तणाव असताना, आता व्हिसाच्या मुद्यावरूनही त्यात ताण वाढू शकतो. मात्र आता ट्रम्प प्रशासनाने डॉक्टरांना सूट दिल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.