कानपुरमधून सुरु झालेला हा वाद आता देशाच्या दुसऱ्या शहरात पोहोचला आहे. तिथून येणारे फोटो चिंताजनक आहेत. मुस्लिम समाज रागात आहे आणि हातात ‘I LOVE MOHAMMAD’ चे फलक घेऊन प्रदर्शन करत आहेत. लखनऊ, कानपूर, काशीपुर, लातूर आणि हैदराबादपासून गुजरातच्या गोधरापासून अनेक शहरात असे फोटो दिसले आहेत. अनेक विरोध प्रदर्शना दरम्यान लोकांनी कायदा आपल्या हातात घेतला. पोलिसांसोबत वादावादी,धक्काबुक्की झाली. पोलिसांना पळवलं त्यांच्या युनिफॉर्मवर लावलेले स्टार सुद्धा खेचून काढले.
4 सप्टेंबर रोजी यूपीच्या कानपुरमध्ये एक पोस्टर लावलेला. त्यावर लिहिलेलं I LOVE MOHAMMAD. या पोस्टरला हिंदू संघटनांनी विरोध केला. त्यानंतर यूपी पोलिसांनी कारवाई करत 25 युवकांविरोधात गुन्हा नोंदवला. यामुळे मुस्लिम समाज भडकला आणि अनेक शहरात विरोध प्रदर्शन सुरु झालं. कुठल्या कटाअंतर्गत हे विरोध प्रदर्शन सुरु आहे का? हा प्रश्न आहे.
काशीपुरमध्ये काय घडलं?
कानपुरपासून सुरु झालेला हा वाद आता देशाच्या दुसऱ्या शहरात पोहोचला आहे. उत्तराखंडच्या काशीपुरमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. विनापरवानगी निघालेल्या मिरवणुकीमुळे शहरात दंगली सारखी स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. दगडफेक, तोडफोड आणि पोलिसांवर हल्ला सुद्धा झाला. पण पोलिसांनी लगेच कारवाई करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. काशीपूरच्या अलीखान भागात अचानक काही लोकांनी I Love मोहम्मद लिहिलेला बॅनर हाती घेऊन मिरवणूक काढली. प्रशासनाकडून कुठलीही परवानगी घेतली नव्हती. पोलिसांना या बद्दल काही माहित नव्हतं. बघता, बघात जमाव वाढत गेला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. दगडफेक, धक्काबुक्की आणि पोलिसांना मारहाणीपर्यंत परिस्थिती चिघळली.
महाराष्ट्रात कुठे निघाली रॅली?
महाराष्ट्राच्या लातूरमधून हैराण करणारं चित्र समोर आलं. लातूरमध्ये मुस्लिम समुदायाकडून I Love मोहम्मदच्या घोषणा देत एक भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली आजमगंज गोलाई येथून सुरु होऊन टाऊन हॉल पर्यंत पोहोचली. रॅली दरम्यान भावना खूप तीव्र होत्या. जागो जागी मुस्लिम समाजाचे लोक मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी होत होते. पाहता, पाहता हजारोंची संख्या लाखोंमध्ये बदलली. या रॅलीमध्ये यूपी सरकार मुर्दाबादच्या सुद्धा घोषणा देण्यात आल्या. प्रशासनाकडून सुरक्षेची काटेकोर व्यवस्था करण्यात आलेली. जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रत्येक ठिकाणी तैनात होते. लातूरमध्ये ही रॅली शांततापूर्ण राहिली पण घोषणाबाजीमुळे वातावरण गरम झालेलं.