Kolhapur Crime : पत्नीसोबत मॉर्निंग वॉकला जाऊन आला, घरात येताच काही मिनीटात गळफास घेतला; कारण काय?
esakal September 24, 2025 04:45 PM

शिवाजी विद्यापीठात कंत्राटी कर्मचारी होते; बेशुद्ध अवस्थेत त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले पण उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Kolhapur : मॉर्निंग वॉकला जाऊन आल्यानंतर एकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दौलतनगरमध्ये सोमवारी ही घटना घडली. स्वप्नील प्रकाश राठवडे (वय ४०) असे त्यांचे नाव आहे.

ते शिवाजी विद्यापीठात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. सकाळी ते पत्नीसोबत विद्यापीठात फिरायला गेले होते. तेथून परत आल्यानंतर त्यांनी गळफास घेतला. त्यांना बेशुद्ध अवस्थेत सीपीआरमध्ये दाखल केले.

मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

kolhapur Kalamba Jail : पळून जाणाऱ्या कैद्यांना चाप लावण्यासाठी कळंबा कारागृहात आता अत्याधुनिक डिजिटल यंत्रणा, काय आहे अलार्म सिस्टीम

Q१. मृत व्यक्ती कोण होते?

➡️ स्वप्नील प्रकाश राठवडे (वय ४०), शिवाजी विद्यापीठातील कंत्राटी कर्मचारी.

Q२. घटना कशी घडली?

➡️ सकाळी पत्नीसमवेत मॉर्निंग वॉकला जाऊन आल्यानंतर त्यांनी घरात गळफास घेतला.

Q३. त्यांना रुग्णालयात नेले का?

➡️ हो, बेशुद्ध अवस्थेत सीपीआर हॉस्पिटलमध्ये नेले, पण उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

Q४. आत्महत्येचे कारण समजले आहे का?

➡️ नाही, अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.