तुम्ही विमानातून प्रवास करत आहात आणि विमान आकाशात उडत असताना अचानक त्याचे छत उडून गेले तर..चारी बाजूंनी तूफानी हवेचा मारा आणि विमानाचे छड उडून गेल्याने प्रवासी उघड्या आकाशाखाली जीव मुठीत धरुन बसलेत. हे ऐकूनतुम्हाला फिल्मी वाटत असेल परंतू हा अपघात साल १९८८ मध्ये घडला होता. आश्चर्य म्हणजे या भयंकर अपघातातून तरीही ९४ प्रवाशांचे प्राण आश्चर्यकारक वाचले होते.
अचानक आकाशात तुटले विमानअलोहा एअरलाईन्स फ्लाईट क्रमांक- २४३ जेव्हा आकाशात २४ हजार फूट उंचीवर उडत होते. तेव्हा जोरदार धमाका होऊन त्याचा मोठा भाग कोसळला. १८ फूट लांबीचा हा तुकडा हवेत उडून गेला. त्यावेळी आतील वातावरण अक्षरश: चक्रीवादळा सारखे झाले. विमानातील सर्व वस्तू उडून गेल्या आणि अफरातफरी माजली.
एका एअर होस्टेसचा मृत्यू, उर्वरित वाचले‘द इंडिपेंडेंट’च्या बातमीनुसार हवेच्या दबावाने दुर्वैवाने फ्लाईट अटेंडेंट क्लॅरेबेल लॅसिंग ही बाहेर खेचली गेली आणि तिचा मृत्यू झाला. परंतू इतर प्रवासी जखमी झाले तरीही त्यांचे प्राण वाचले. याचे श्रेय कॉकपिटमध्ये बसलेल्या बहादूर पायलट्सना जाते.
पायलट्सने असे वाचवले प्राणकॅप्टन रॉबर्ट शॉर्नस्टायमर आणि फर्स्ट ऑफीसर मॅडेलिन टॉम्पकिंस यांनी लागलीच इमर्जन्सी डिसेंट सुरु केला. हवेचा वेग इतका होता की त्यांचा आवाज एकमेकांना ऐकू येत नव्हता. एका इंजिनला आग लागली होती. तरीही त्यांनी हार मानली नाही. केवळ १३ मिनिटात तुटलेले विमान माऊई एअरपोर्टवर सुरक्षित उतरवले. जेव्हा २४ हजार फूटांवर विमानाचे छत अचानक उडून गेले तेव्हा अचानक केबिनचे प्रेशर कमी झाले आणि ऑक्सीजन कमी झाला. त्यामुळे अनेक प्रवासी बेशुद्ध पडले. परंतू पायलटनी लागलीच इमर्जन्सी डिसेंट सुरु केला विमानाला वेगाने १० हजार फूटांवर आणले. तेथे हवेत पुरेसा ऑक्सिजन असतो. एव्हीएशन मेडिकल डेटानुसार इतक्या उंचीवर मनुष्य विना ऑक्सीजनशिवाय काही मिनिटे तरी शुद्धीवर राहू शकतो. याचमुळे वेळेत विमान खाली आणल्याने ९४ प्रवाशांचे प्राण वाचले.
‘मिरॅकल फ्लाईट’ग्राऊंड स्टाफला विश्वासच बसेना की एवढ्या बिकट स्थिती विमान सुखरुपपणे जमीनीवर उतरले. विमान अपघाताच्या इतिहासात या घटनेला आजही मिरकल फ्लाईट म्हटले जाते. परंतू या विमानाचे छत कसे काय तुटून उडाले याचे आश्चर्य कायम होते. परंतू चौकशीत स्पष्ट झाले की विमान खूपच जुने होते आणि जास्त उड्डाण पूर्ण झाले होते. फ्युजलेज ( बॉडी ) मध्ये मेटल फॅटीज क्रेक पडली होती. आणि एअरलाईनच्या मेनेटन्स टीमला हा दोष सापडला नव्हता. त्यामुळे प्रेशरचा झटका लागताच हा कमजोर हिस्सा तुटला आणि छत उडून केले.