पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना
बुजलेल्या आणि खचलेल्या विहिरींसाठी मिळणार मदत
शेतकऱ्यांना विहीर दुरुस्तीसाठी मिळणार ३०,००० रुपये
सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. यंदा राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती झाली होती. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात, गोठ्यात पाणी घुसले. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले. दरम्यान, आता सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आहे. सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणखी एक योजना सुरु केली आहे.el
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! महिन्याला ५००० रुपये गुंतवा अन् ८.५ लाख मिळवासरकारची नवी योजना (Government Scheme for well)
पूरग्रस्त भागातील खचलेल्या विहिरींसाठी शासनाची नवी योजना जाहीर केली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पूरग्रस्त भागासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोषणेची अंबलबजावणी केली जाणार आहे.येत्या सात दिवसांत तांत्रिक अधिकाऱ्यांना विहिरींच्या स्थळ पाहणीचे आदेश दिले आहे.
कोणाला किती पैसे मिळणार?
सिंचन विहिरींसाठी ३० हजार रुपयांची मदत देणार आहेत. आगाऊ स्वरुपात १५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, काम पूर्ण झाल्यावर उरलेला निधी मिळणार आहे.
PPF Scheme: सरकारची जबरदस्त योजना! दिवसाला ४१६ रुपये गुंतवा अन् ४१.३५ लाख मिळवापंचनामे झालेल्या विहिरींच्या शेतकऱ्यांना गट विकास अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. अर्जासोबत शेतकऱ्यांनी विहिरीचा सातबारा जोडणे आवश्यक आहे.विहिरीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधितांकडून हमीपत्र घ्यावे. विहिरीचे काम झाल्यानंतर त्याचे मोजमाप घेतले जाणार आहे. काम पूर्ण झाल्याची खात्री पटल्यानंतर उर्वरित १५०० रुपयांचा निधी दिली जाणार आहे.
विहिर दुरुस्तीआधी आणि नंतरचे फोटो अपलोड करा
या योजनेअंतर्गत वितरित केलेला निधी या आर्थिक वर्षात खर्च केला जावा. निधी शिल्लक राहिल्यास तो शासनाला परत करावा. दुरुस्त विहिरींचे जीओ टॅगिंग करण्यात यावे.विहिर दुरुस्ती होण्याआधी आणि दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरचे फोटो काढण्यात यावे.
Government Scheme: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची आणखी एक योजना, उद्या होणार लाँच, वाचा बळीराजाला काय होणार फायदा