Stock Market Closing Today: जागतिक संकेतांमुळे सोमवारी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह उघडले आणि दिवसभर घसरणीचा ट्रेंड कायम होता. शेवटच्या काही तासांत बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीपासून सावरताना दिसला. मात्र बंद होताना तो घसरला. निफ्टी 58 अंकांनी घसरून 25,227 वर बंद झाला. सेन्सेक्स 173 अंकांनी घसरून 82,327 वर बंद झाला. बँक निफ्टी 15 अंकांनी वाढून 56,625 वर बंद झाला.