भीमाशंकर, ता. १३ ः तेरुंगण (ता. आंबेगाव) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत शनिवारी (ता. ११) शाश्वत संस्था मंचर यांच्या वतीने आठवी व नववीच्या १०० विद्यार्थ्यांसाठी आर्ट अँड क्राफ्ट या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेचे प्रशिक्षक हिंदुराव गेजगे यांनी विद्यार्थ्यांकडून मॅजिक मेसेज, दिवाळी ग्रीटिंग, वारली चित्रकारी, पाम ट्री पाने, फुलांचा आकार अशा विविध आकर्षक वस्तू तयार करून घेतल्या. कार्यशाळेसाठी ग्लीलेटेड पेपर, टिंटेड पेपर, मोत्यांची माळ, सोनेरी धागा, स्केच पेन, मार्कर पेन व इतर साहित्य वापरण्यात आले. कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना रंजक पद्धतीने कला तर शिकवली गेलीच पण त्यांना टाळ्यांच्या साह्याने पावसाचा आवाज, रेल्वे प्रवासाचा अनुभव व गीतांनी त्यांचे मनोरंजन करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक अभिमन्यू भुजबळ, अधीक्षक माधव मोतेवाड, अधीक्षिका रोशनी पवार, परिचारिका विद्या कोळप तसेच शाश्वत संस्थेच्या विश्वस्त प्रतिभा तांबे, तेजश्री कसबे, शांताराम गुंजाळ उपस्थित होते.