प्रवास करताना तुम्ही अनेकदा गुगल मॅपचा वापर करत असाल. मात्र अनेकदा गुगल मॅप चुकीचा रस्ता दाखवते. गुजरातमधून अशीच एक घटना समोर आली आहे. पाच सॉफ्टवेअर इंजीनिअरचं नर्मदा जिल्ह्यात ट्रेकिंगला गेले होते. मात्र गुगल मॅप्सने त्यांची दिशाभूल केली, ज्यामुळे ते मार्ग चुकले आणि जंगलात अडकून पडले. त्यांनी जंगलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना अपयश आले. या तरुणांचे काय झाले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
गुगल मॅप्समुळे जंगलात अडकलेसमोर आलेल्या माहितीनुसार मूळचे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील 5 तरुण नर्मदा जिल्ह्यातील जारवानी जवळील जंगलातील स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात ट्रेकिंगला गेले होते. त्यांनी गुगल मॅप्सवर तुंगाई टेकडी शोधले आणि प्रवास सुरु केला. या सर्वांनी जारवानी गावातील भांगडा फलियाजवळ बाईक पार्क केल्या आणि गुगल मॅप्सच्या मदतीने चढाई सुरू केली. पहाटे 2.30 च्या सुमारास त्यांना कळले की ते चुकीच्या मार्गावर आहेत. ते वेगळ्याच ठिकाणी पोहोचले होते.
हितेश सुरेश पेनमुसु, हिमतेज वारा प्रसाद वाल स्वामी, विकियत नागेश्वर राव चिलियाला, लिहित चेतन मेका आणि सुशील रमेश भंडारू हे पाच तरूण जंगलात हरवले होते. यानंतर लिहितने त्याच्या आईला फोन करून माहिती दिली. त्याची आई सुभाषिनी तेलंगणातील टीडीपीची माजी राज्य संघटन सचिव आहे. त्यांनी या घटनेबाबत गृहमंत्री हर्ष संघवी यांना टॅग करून ट्विट केले.
पोलीसांनी तरुणांना शोधलेसुभाषिनी यांनी ट्विटमध्ये की, माझा मुलगा आणि त्याचे पाच मित्र गुजरातमधील जंगलात ट्रेकिंग करताना मार्ग चुकले आहेत. ते सर्व जंगलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना मार्ग सापडत नाही. या ट्विटनंतर गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी मदत केली. त्यांनी स्थानिक रहिवाशांना आणि नर्मदा पोलांसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलीसांनी या पाच तरुणांना शोधून काढले. या तरुणांनी सांगितले की, ‘आम्ही सध्या वडोदरा येथे राहतो, आम्ही जंगलात ट्रेकिंगला गेले होते, मात्र रस्ता चुकलो आणि जंगलात अडकलो.’ आता या पाचही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.