सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटण्यापूर्वी संजय राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले, फ्रॉड..
Tv9 Marathi October 14, 2025 03:45 PM

संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केली आहेत. राऊत म्हणाले की, निवडणूक म्हणजे मोठा फ्रॉड झाला आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाला भेटणार आहे. मुळात म्हणजे निवडणूक आयोग कोणतीही दखल घ्यायला तयार नाही. मुंबई, ठाणेमध्ये बोगस मतदार आहेत. आज आम्ही त्यांना दाखवू की, निवडणूक आयोगाची कशी जोकरगिरी सुरू आहे. मते येतात कशी? वाढतात कशी? हे आम्ही त्यांना दाखवणार आहोत. नाशिकमध्ये साडे तीन लाख मते बोगस आहेत. विधानसभेला आम्हाला याचा फटका बसला. आता महापालिकेला याचा फटका बसू नये, म्हणून आम्ही भेट घेणार आहोत.

संजय राऊतांचे गंभीर आरोप

मिंदेंचा पक्ष, अजित पवारांचा पक्ष आम्ही मानतच नाहीत. देशात एवढं कधी बोगस मतदान कधी झाले नाही. राज ठाकरे महाविकास आघाडीत येऊ शकतात का? या प्रश्नावर बोलताना संजय राऊतांनी म्हटले की, हा प्रश्न तुम्ही राज ठाकरेंना विचारला पाहिजे. मुंबई महापालिकेत VVPAT  का नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यासोबतच त्यांनी यावरून गंभीर आरोप केली आहेत.

मुंबई महापालिकेत VVPAT  का नाहीत? 

संजय राऊत यांनी पुढे म्हटले की, आमचं शिष्टमंडळ सर्वांसाठी खुलं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि राज्यातील सर्व मोठे नेते आज निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. अचानक मतदारांची संख्या वाढत आहे. मोठे मोठे नेते शिष्टमंडळात असून आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारणार आहोत. मनसेला सोबत घेतल्याने कॉग्रेसला समस्य असल्याचे मला तरीही वाटत नाही.

शिष्टमंडळ घेणार निवडणूक आयोगाची भेट 

मनसे आणि शिवसेना एकत्र आले आहेत, बाकी ज्यांना पाहिजे ते येतील आमच्यासोबत. नाशिकमध्येही काल मोठा मोर्चा निघाला. अनेक मुद्द्यांमध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाला मी पक्षच मानत नसल्याचे ठामपणे सांगताना संजय राऊत हे दिसले आहेत. आज निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट शिष्टमंडळ घेणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.