१० पैकी पाच गण महिलांसाठी
महाड पंचायत समितीत आरक्षण सोडत जाहीर
महाड, ता.१३ (बातमीदार): महाड पंचायत समितीच्य सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी दहा गणांच्या आरक्षण सोडत सोमवार काढण्यात आली. आरक्षण प्रक्रियेनुसार पाच जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
धामणे गण अनुसूचित जमातीसाठी, बिरवाडी गण सर्वसाधारण, वरंध गण सर्वसाधारण (महिला), खरवली गण नामाप्र (महिला), नडगावतर्फे बिरवाडी गण सर्वसाधारण (महिला), नाते गण सर्वसाधारण, दासगाव गण नामाप्र, अप्परतुडील गण सर्वसाधारण (महिला),करंजाडी गण सर्वसाधारण, विन्हेरे गण सर्वसाधारण (महिला) असे आरक्षण जाहीर करण्यात आले. या सोडत प्रक्रियेला तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ः----------------------------
मतदारयाद्यांची उत्सुकता
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू असून २७ ऑक्टोबर रोजी मतदारयादी जाहीर होणार आहे. तर काही हरकती अथवा सूचना असल्यास नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार महेश शितोळे यांनी केले.