एक केस तुटल्याने सलमानला झालेला स्वत:चा जीव संपण्याचा आजार, नाष्टा करायला लागायचा दीड तास, सात वर्ष...
esakal October 14, 2025 07:45 PM

बॉलिवूडचा स्टार अभिनेता सलमान खान याचे लाखो चाहते आहेत. त्याची बॉडी वगैरे पाहून हा अजूनही इतका तंदुरुस्त कसा दिसतो असा प्रश्न चाहत्यांना पडतो. परंतु तुम्हाला माहितीय का? बॉलिवूडचा भाईजान याला मोठा आजार झाला होता. या आजारामध्ये त्याचे जवळपास सात ते आठ वर्ष गेली होती. सलमानने सात वर्ष कंरट लागल्यासारखं दुखणं सहन केलय. नाष्टा तसंच ब्रश करणं सुद्धा त्याला त्रास द्यायचं. परंतु हे सगळं घडलं कसं तर चेहऱ्यावरील एक केस काढण्याचं निमित्त झालं आणि भाईजानला स्वत:चा जीव संपण्यासारखा आजार झाला. याला सुसाईड डिजीज सुद्धा म्हणतात.

सलमान खानने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, त्याला ट्राइजेमिनल न्यूराल्जिया नावाचा आजार झाला आहे. या आजाराला लोक सुसाईड डिजीज सुद्धा म्हणतात. या आजारात इतका त्रास होतो की, पेशंटला खाणं, बोलणं सुद्धा एका शिक्षेसारखं वाटू लागतं. सलमान खाननं या आजाराचं दुखणं एक दोन नाहीतर सात वर्ष सहन केलय. या आजारपणात भाईजानला इतका त्रास व्हायचा की त्याच्या नसा जोरात दुखायच्या.

काय आहे ट्रइजेमिनल न्युराल्जिया?

डॉक्टरांच्या माहितीनुसार ट्राइजेमिनल न्युराल्जिया हा चेहऱ्यांवरील नसांचा आजार आहे. यामध्ये ट्राइजेमिनल नर्ववर दबावाची समस्या निर्माण होते. यामुळे चेहऱ्यावर शॉक लागल्यासारखा इटका येतो आणि जोरात दुखणं सुरु होतं. हे दुखणं कधीही कुठेही सुरु होऊ शकतं. तसंच अनेक तास ते दुखणं जसं शी तसं राहू शकतं.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

स्वत:चा जीव संपण्याचा आजाराला काय म्हणतात?

या आजाराला 'सुसाईड डिजीज' म्हटलं जातं. या आजारात दुखणं असाह्य होतं. नंतर नंतर दुखणं इतकं वाढतं की, पेशंटला जगणं अवघड होऊन जातं. हलकी हवा सुद्धा चेहऱ्याला नकोशी वाटते. सहन न होणारं दुखणं हवेद्वारे जाणवतं. त्यामुळे या आजाराला जगातील सगळ्यात जास्त त्रास होणारा आजार सुद्धा म्हटलं जातं.

आजारपणातून कसा बाहेर आला सलमान?

सलमान खानने या आजाराचा मोठ्या हिमतीने सामना केला. त्याने योग्य ते उपचार घेतले. तसंच आजारपणाकडे दुर्लक्ष करत त्याने आपलं काम सुरु ठेवलं. आजारावर मात करत तो पुन्हा त्याच जोशात चित्रपटात काम करु लागला. सलमान खान सगळ्यांसाठी एक चांगलं उदाहरण आहे ज्याने या गंभीर आजारावर मात केलीय.

'तो विचित्र स्वभावाचा माणूस' जुन्या प्रसंगावरून अन्नू कपूर यांची नवाजुद्दीन सिद्दीकीवर अप्रत्यक्ष टीका
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.