टीम इंडियाने मंगळवारी 14 ऑक्टोबरला वेस्ट इंडिजला दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात 7 विकेट्सने पराभूत केलं. टीम इंडियाने यासह वेस्टइंडिजला 2-0 अशा फरकाने व्हाईटवॉश केलं. भारताने यासह शुबमन गिल याच्या नेतृत्वात मायदेशातील आणि एकूणच पहिली मालिका जिंकली. तर रोस्टन चेज याच्या नेतृत्वात विंडीजने भारत दौरा केला. विंडीजने दुसऱ्या कसोटीत फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात चिवट प्रतिकार केला. मात्र टीम इंडियाने विंडीजला लोळवलं.
टीम इंडिया यानंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे आणि टी 20i सीरिज खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वेस्ट इंडिज भारतनंतर बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. विंडीज बांगलादेश विरुद्ध दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी 3-3 सामने खेळणार आहे. विंडीज क्रिकेट बोर्डाने या दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे. विंडीजने या मालिकेसाठी कॅप्टन बदलला आहे. टीम इंडिया विरुद्ध शतक करणाऱ्या रोस्टन चेज याला दोन्ही मालिकांसाठी कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
तसेच अकीम ऑगस्टे याला एव्हीन लुईस याच्या जागी एकदिवसीय संघात संधी देण्यात आली आहे. एव्हीनला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. तसेच खारी पियरे याचा समावेश करण्यात आला आहे. रमोन सिमंड्स आणि अमीर जंगू या दोघांना टी 20i मालिकेत स्थान देण्यात आलं आहे.
विंडीजच्या बांगलादेश दौऱ्याची सुरुवात 18 ऑक्टोबरपासून होणार आहे. तर 31 ऑक्टोबरला या दौऱ्याची सांगता होणार आहे. या दरम्यान एकूण 2 मालिकांमध्ये 6 सामने होणार आहेत.
पहिला सामना, 18 ऑक्टोबर, ढाका
दुसरा सामना, 21 ऑक्टोबर, ढाका
तिसरा सामना, 23 ऑक्टोबर, ढाका
पहिला सामना, 27 ऑक्टोबर, चट्टोग्राम
दुसरा सामना, 29 ऑक्टोबर, चट्टोग्राम
तिसरा सामना, 31 ऑक्टोबर, चट्टोग्राम
वनडे सीरिजसाठी विंडीज टीम: शाई होप (कॅप्टन), अलिक अथनाजे, रॉस्टन चेज, अकीम ऑगस्टे, जेडियाह ब्लेड्स, केसी कार्टी, जस्टिन ग्रेव्स, अमीर जंगू, शामर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, खारी पियरे, शेरफेन रदरफोर्ड, जेडन सील्स आणि रोमारियो शेफर्ड.
टी 20 मालिकेसाठी टीम: शाई होप (कॅप्टन), अलिक अथनाजे, अकीम ऑगस्टे, रॉस्टन चेज, जेसन होल्डर, अकील होसेन, अमीर जंगू, शामर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, रोवमॅन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, जेडन सील्स, रोमारियो शेफर्ड आणि रमोन सिमंड्स.