रत्नागिरी- कर्वे नर्सिंग कॉलेजचा एएनएमचा निकाल १०० टक्के
esakal October 16, 2025 12:45 AM

rat13p15.jpg-
N98291
रत्नागिरी : महर्षी कर्वे शिक्षणसंस्थेच्या कॉलेज ऑफ नर्सिंगमधील एएनएम कोर्सच्या द्वितीय वर्षातील यशस्वी विद्यार्थिनी.
----------

कर्वे नर्सिंग कॉलेजचा एएनएमचा निकाल १०० टक्के
रत्नागिरी, ता. १४ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्था, कॉलेज ऑफ नर्सिंगच्या एएनएम कोर्सचा द्वितीय वर्षाचा निकाल महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व परावैद्यक शिक्षणमंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला. या परीक्षेत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्या. महाविद्यालयाने पुन्हा एकदा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू झालेली ही पहिलीच बॅच असून, पहिल्या वर्षीदेखील १०० टक्के निकाल लागला होता. या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत सिद्धी लिंगायत (७७.६ टक्के) गुण मिळवत प्रथम, वृषाली रावणंग (७६.१) गुणांसह द्वितीय आणि मनीषा बोडेकर (७५.८) गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला आहे. प्र. प्राचार्या समिना मुलानी, शिक्षिका गौरी भाटकर, रश्मी यादव यांचे मार्गदर्शन विद्यार्थिनींना लाभले. या सर्वांचे अभिनंदन नर्सिंग महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैद्य धनंजय कुलकर्णी, रत्नागिरी प्रकल्पाच्या अध्यक्षा विद्या कुलकर्णी, प्रकल्पप्रमुख मंदार सावंत देसाई, नर्सिंग कॉलेजच्या मार्गदर्शक डॉ. मीना गणपती, रत्नागिरी प्रकल्प समन्वयक तसेच सर्व स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.