मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या 69 व्या वर्षी निधन झालं. अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. ठरलं तर मालिकेतील पुर्णा आजीची भूमिका त्या साकारत होत्या. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. दरम्यान अशातच ज्योती चांदेकर यांची मुलगी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आईच्या आठवणीत भावूक झालेलं पहायला मिळालं. एका कार्यक्रमात तिने आईबद्दलच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
काही दिवसापूर्वी तेजस्विनी पंडित हिने लोकशाही मराठीच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यादरम्यान ती आईविषयी बोलताना भाऊक झालेलं पहायला मिळालं. यावेळी तेजस्विनीनं मनातील भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमात बोलताना ती म्हणाली की, 'आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नेहमी आई वडिलांच्या मनाप्रमाणे गोष्टी करा. मला आणि माझ्या बहिणीला आईसोबत खूप गोष्टी करायच्या होत्या. कारण वडील गेल्यावर त्यांच्यासोबत जे करायचं राहिलं होतं. ते आईसोबत तरी करुया असं वाटलेलं. परंतु 16 ऑगस्टला आई गेली. 31 ऑगस्टला तिचा वाढदविस असतो. त्या दिवशी आम्ही तिच्यावर पुस्तक प्रकाशित करणार होतो. परंतु अचानक तीन दिवसात अशा गोष्टी घडल्या. 12 तारखेला तिला रुग्णालयात दाखल केलं. आणि तीन दिवसात ती सोडून गेली.'
पुढे बोलताना तेजस्विनी म्हणाली की, 'आईला थंडी वाजून ताप आल्याचं कारण झालं आणि ती तीन दिवसातच आम्हाला सोडून गेली. मी सगळ्यांना हीच गोष्ट सांगेल. मी सगळ्यांना हेच सांगेन की, तुम्ही जर तुमच्या आईबरोबर किंवा तुमच्या कुटुंबाबरोबर काही गोष्टी ठरवल्या असतील तर त्या करा.. कारण खरंच भविष्याचा काही नेम नाहीय.' असं ती कार्यक्रमात बोलताना म्हणाली.
View this post on InstagramA post shared by Tejaswwini ️ (@tejaswini_pandit)
तसंच तेजस्विनी असं सुद्धा म्हणाली की, 'आईची नाटकापासून प्रवासाला सुरुवात झाली, त्यानंतर मालिका सिनेमामध्ये ती काम करु लागली. ज्या माध्यमांमध्ये ती काम करायची त्यावर्षी सगळे पुरस्कार घरी असायचे. तिच्या पोटी जन्म घेणं हे माझं अहोभाग्यचं आहे. मी ते पुढे नेण्याचा प्रयत्न करेल.' असं ती मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाली आहे. सध्या तिच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा होताना पहायला मिळतेय.
संकर्षण कऱ्हाडेंनी घेतली नितिन गडकरी यांची भेट, भेटीदरम्यान मिळाली खास भेट, अभिनेता म्हणाला...