शिवसेनेनेच्या रोजगार मेळाव्यास मोठा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १२ : शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्यातर्फे आयोजित पोयनाड येथे रोजगार मेळाव्यास तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला. या मेळाव्यास ४० कंपन्यांनी सहभाग घेतला असून तीन हजारांहून अधिक तरुणांनी मुलाखती दिल्या. यावेळी कामगार नेते दिपक रानवडे, युवासेना तालुकाप्रमुख संदेश थळे, कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रसिका केणी आदी मान्यवर उपस्थित होते. तर, प्रमुख शिवसेना नेत्या मानसी दळवी यांनी राजाभाई केणी, रसिका केणी आणि त्यांच्या सहकार्यांचे कौतुक केले. या मेळाव्यात मुलाखती दिल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते तत्काळ नियुक्ती पत्रे देण्यात आली.