AUS vs BAN Live Streaming : बांगलादेशसमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान, गतविजेता चौथ्या विजयासाठी सज्ज, कोण जिंकणार?
Tv9 Marathi October 16, 2025 07:45 AM

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. या स्पर्धेतील सहभागी 8 संघांनी प्रत्येकी 4-4 सामने खेळले आहेत. आता पाचव्या आणि निर्णायक फेरीचा थरार रंगणार आहे. या पाचव्या फेरीतील पहिल्या सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. एलिसा हीली ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर निगर सुल्ताना हीच्याकडे बांगलादेशच्या कर्णधारपदाची सुत्र सांभाळणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामना केव्हा?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामना गुरुवारी 16 ऑक्टोबरला होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामना कुठे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामना एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.

गतविजेता ऑस्ट्रेलिया अजिंक्य

ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत आतापर्यंत कडक कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलियाने 4 सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने त्यापैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 1 सामना पावसामुळे रद्द झाला. ऑस्ट्रेलिया पॉइंट्स टेबलमध्ये 7 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट हा +1.353 असा आहे.

गुरुवारी कोण जिंकणार?

Bangladesh 🇧🇩 🆚 Australia 🇦🇺 | Match 17 | Women’s Cricket World Cup 2025

16 October 2025 | 3:30 PM | ACA-VDCA Cricket Stadium, Visakhapatnam

Photo Credit: ICC/Getty#Bangladesh #TheTigress #BCB #Cricket #WomenWorldCup #Cricket #TigressForever #WomenWorldCup2025 #CWC25 pic.twitter.com/ycBjUJkpeO

— Bangladesh Cricket (@BCBtigers)

बांगलादेशची कामगिरी

तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशने या मोहिमेतील आपली सुरुवात विजयाने केली. बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत केलं. मात्र त्यानंतर बांगलादेशने सलग 3 सामने गमावले. इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला लोळवलं. त्यामुळे बांगलादेशला स्पर्धेत कायम रहायचं असेल तर गुरुवारी कोणत्याही स्थितीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकावं लागणार आहे. मात्र ऑस्ट्रेलियाला रोखणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे या सामन्यात बांगलादेश कमाल करणार की ऑस्ट्रेलिया विजयी घोडदौड कायम राखणार? हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.