वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत शेवटचा खेळला होता. त्यानंतर त्याचा विचार केला गेला नाही. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दौऱ्यातही त्याची निवड केली नाही. मुख्य निवडकर्ते आगरकर यांनी उत्तर दिलं होतं की, शमीच्या तंदुरुस्तीबाबत आमच्याकडे काही माहिती नाही. (Photo- PTI)
मोहम्मद शमी रणजी ट्रॉफी स्पर्धेत बंगालकडून खेळत आहे. त्याने उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात कमाल केली. अजित आगरकरच्या या प्रश्नाचं उत्तर मोहम्मद शमीने रणजी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दिलं आहे. मोहम्मद शमीने एकाच षटकात तीन गडी बाद करत आपला फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करून दाखवला आहे. (Photo- PTI)
मोहम्मद शमीने सुरुवातीला 14 षटकं टाकली पण काही केला यश मिळत नव्हतं. उत्तराखंडच्या 7 विकेट गेल्या होत्या. त्यामुळे मोहम्मद शमी विकेटसाठी प्रयत्न करत होता. पण 15 व्या षटकात त्याने कमाल केली आणि एकाच षटकात तीन जणांना तंबूत पाठवलं. त्याच्या या कामगिरीमुळे उत्तराखंडचा डाव 213 धावांवर आटोपला. (Photo- PTI)
मोहम्मद शमीने त्याच्या षटकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट काढली. त्याला चौथ्या चेंडूवर हॅटट्रीकची संधी होती, पण ती हुकली. मात्र पाचव्या चेंडूवर त्याने तिसरी विकेट काढली. मोहम्मद शमीने 14.5 षटकात 37 धावा देत 3 गडी बाद केले. यात 4 षटकं निर्धाव टाकली. (Photo- PTI)
मोहम्मद शमी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकही सामना खेळलेला नाही. त्याच्या फिटनेसमुळे त्याला संधी मिळाली नाही असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. पण आता फिट असताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्थान मिळालं नाही याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याचा विचार होतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. (Photo- Gareth Copley-ICC/ICC via Getty Images)