सावळेश्वर: येथील ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तत्काळ व प्रभावी वापरामुळे ११ एकर ऊस आगीपासून वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. गावातील कैलास गुरव व धनाजी नीळ यांच्या उसाला मंगळवारी (ता. १४) दुपारी दीडच्या सुमारास आग लागली.
MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात!याची माहिती कळताच गावचे पोलिस पाटील चंद्रकांत गुंड यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (१८००२७०३६००) क्रमांकावरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच तेथे गावकरी मदतीसाठी धावले व उसाला लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने आटोक्यात आणण्यात यश आल्याने उर्वरित ११ एकर ऊस आगीपासून वाचविण्यात यश आले.\
सावळेश्वरचे सरपंच सखाराम साठे, ग्रामपंचायत सदस्य दादाराव लांडगे व पोलिस पाटील गुंड यांच्या प्रयत्नातून गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे राबविली जात आहे. विविध सूचना देण्यासाठी गावात ग्रामसुरक्षा यंत्रणेचा ६८ वेळा वापर करण्यात आला आहे. जिल्हा ग्रामीण पोलिस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांचा संयुक्त उपक्रम असणाऱ्या या यंत्रणेत जिल्ह्यातील १०३० गावांतील ११.६१ लाख नागरिक सहभागी आहेत. आजवर जिल्ह्यात १९ हजार २४७ वेळा यशस्वी वापर करण्यात आला आहे.
Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवासर्व नागरिकांना कॉल स्वरूपातील मेसेज तत्काळ ऐकवला गेल्याने गावात उपस्थित सीताराम गुंड, राजू टेकाळे, तानाजी, टेकाळे, सत्यवान चटके, विलास गावडे, जीवन लांडगे, शौकत शेख आणि संपूर्ण नीळ कुटुंब तसेच सर्व नागरिकांनी मिळून आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केल्याने ग्रामसुरक्षा यंत्रणेचे कौतुक होत आहे.