मागच्या आठवड्यापासून सुरु असलेलं कतर-अफगाणिस्तान युद्ध आता थांबलं आहे. 48 तासांसाठी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला आहे. दोन्ही देशांकडून आपण पहिली हार मानली नाही, असं सांगितलं जातय. अफगाणिस्तानच म्हणणं आहे की, पाकिस्तानने पहिली युद्धविरामाची मागणी केली, पाकिस्तानचा दावा आहे की, अफगाणिस्तानने युद्ध विरामासाठी पहिला फोन केला. दोन्ही देशांमध्ये असे दावे-प्रतिदावे सुरु असताना आता शांतता घडवून आणण्यात कतरची भूमिका समोर आली आहे. कतरच्या पुढाकाराने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये अस्थायी युद्धविरामाची घोषणा झाली. दोन्ही देशांमध्ये चार दिवस युद्धासारखी स्थिती होती. दोन्ही देश आता पुढे शांततेसाठी वाटाघाटी करतील.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान शेजारी देश असून त्यांची 2600 किलोमीटरची सीमा परस्परांना लागून आहे. दोन्ही देशांमध्ये डूरंड लाइन आणि दहशतवादावरुन मतभेद आहेत. तालिबान दहशतवादाला आसरा देऊन आमचं क्षेत्र अस्थिर करतोय असा पाकिस्तानचा आरोप आहे.
अफगाणिस्तान-पाकिस्तानचा दावा काय?
अफगाणिस्तानकडून युद्ध विरामाची घोषणा प्रवक्ता जबिबुल्लाह मुजाहिदने केली. त्याने म्हटलं की, पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम केला जातोय. पाकिस्तानने पुढेही हल्ला केला, तर त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. असच स्टेटमेंट पाकिस्तानने सुद्धा जारी केलं. तालिबानच्या विनंतीने युद्धविराम केल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. तालिबानच्या विनंतीमुळे युद्ध थांबवत आहोत. पण पाकिस्तानची पुढेही दहशतवादाविरुद्ध कारवाई सुरु राहिलं.
पाकिस्तानच्या डार यांच्याशी संपर्क साधला
बीबीसी उर्दूनुसार, युद्धविरामाच्या घोषणेनंतर लगेचच कतरच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इशाक डार यांच्याशी फोनवर चर्चा केली. कतरचे परराष्ट्र मंत्री डॉ. मुहम्मद अब्दुल अजीज अल-खेलाईफी यांनी डार यांना हा फोन केला. डार पाकिस्तानचे उप पंतप्रधान असण्याबरोबरच परराष्ट्र मंत्री सुद्धा आहेत.
कतरने या फोन कॉलच्या माध्यमातून क्षेत्राच्या वर्तमान स्थितीबद्दल एक संदेश दिला. क्षेत्रात शांतता स्थापित करण्यासाठी रचनात्मक भूमिका निभावल्याबद्दल पाकिस्तानच कौतुक केलं. डार यांनी सुद्धा शांतता स्थापनेसाठी कतरचे आभार मानले.
कतरने हा आरोप ना स्वीकारला, ना फेटाळला
कतर तालिबानचा जवळचा आणि विश्वासू मित्र आहे. तालिबानचा राजकीय कार्यालय कतरमध्ये आहे. अमेरिका अफगाणिस्तानात तालिबान विरोधात लढत असताना कतरने अमेरिका आणि तालिबानमध्ये करार घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. 2021 मध्ये कतरच्या पुढाकाराने तालिबानने दोहा करार केला होता. सध्याच्या बगराम बेसवरुन सुरु असलेल्या वादात अमेरिकेने कतरवरच चर्चेची जबाबदारी सोपवली आहे. कतरवर अनेक वर्षांपासून तालिबानला फंडिंग केल्याचा आरोप झालाय. कतरने हा आरोप कधी स्वीकारला नाही, तसच फेटाळून सुद्धा लावला नाही.